Worlds Richest Cricketer | क्रिकेटच्या जगात कोट्यवधींची उलाढाल होते, पण जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू असा आहे, ज्याने एकाही आंतरराष्ट्रीय सामन्यात भाग घेतलेला नाही. सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गजांपेक्षा तब्बल 6 पट अधिक संपत्ती असलेल्या या क्रिकेटपटूचं नाव ऐकून तुम्हालाही धक्का बसेल!
आर्यमन बिर्ला: उद्योगजगतातील वारसाचा क्रिकेटकडे वळलेला प्रवास
भारताचे प्रसिद्ध उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla) यांचा मुलगा आर्यमन बिर्ला (Aryaman Birla) हा सध्या जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू मानला जातो. त्याने मध्य प्रदेश (Madhya Pradesh) संघातून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळ केला असून, त्याचा शेवटचा सामना जानेवारी 2019 मध्ये आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) विरुद्ध इंदूरमध्ये झाला होता.
2017-18 या हंगामात आर्यमनने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. याच सत्रात तो मध्य प्रदेश रणजी संघात सहभागी झाला. IPL 2018 मध्ये राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाने आर्यमनला 30 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. मात्र त्याला एकाही IPL सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.
70 हजार कोटींचा वारसा; मास्टर ब्लास्टरपेक्षा सहापट संपत्ती
काही मीडिया रिपोर्टनुसार, आर्यमन सध्या क्रिकेटपासून दूर राहून कौटुंबिक उद्योगावर लक्ष केंद्रित करत आहे. बिर्ला ग्रुपचा हा वारस अंदाजे 70,000 कोटींचा मालक आहे.
तुलनात्मकदृष्ट्या पाहिलं, तर सचिन तेंडुलकर ₹1,200 कोटी, विराट कोहली (Virat Kohli) ₹1,000 कोटी, एमएस धोनी (MS Dhoni) 923 कोटी संपत्तीचे मालक आहेत. तर आर्यमनची संपत्ती सचिनच्या संपत्तीपेक्षा जवळपास 6 पट अधिक आहे.
आर्यमन बिर्लाने 9 प्रथम श्रेणी सामने खेळले असून त्यात त्याने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 414 धावा केल्या. 4 लिस्ट ए सामन्यांमध्ये त्याने 36 धावा केल्या. 2019 मध्ये वैयक्तिक कारणांमुळे क्रिकेटमधून त्याने ब्रेक घेतला आणि त्यानंतर तो व्यवसायात पूर्णवेळ गुंतला.
Title : Worlds Richest Cricketer Aryaman Birla net worth






