विराट कोहली आणि अनुष्का शर्मा देश सोडणार?; ‘या’ देशात होणार शिफ्ट?

On: March 20, 2024 4:40 PM
Virat Kohli and Anushka Sharma
---Advertisement---

Virat Kohli | भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) दुसऱ्यांदा वडील झाला आहे. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) त्यांच्या दोन मुलांसोबत आनंदात आहे. अनुष्काला आधीच मुलगी वामिका होती आणि आता 15 फेब्रुवारीला तिने मुलगा अकायला जन्म दिला.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा देश सोडणार?

इंस्टाग्रामवर त्यांनी मुलगा अकायच्या जन्माची गोड बातमी शेअर केली. आता दोघेही आपल्या मुलांसह यूकेला शिफ्ट होणार असल्याच्या सध्या सुरू आहेत. अनुष्काला लंडनमध्ये राहून जवळपास 5 महिने उलटून गेले आहेत.

नुकताच कोहली भारतात परतला पण अनुष्का शर्मा त्याच्यासोबत नव्हती आणि ती मुलांसोबत यूकेमध्ये राहिली आहे. अनुष्का डिसेंबर 2023 मध्ये भारतात होती.

फेब्रुवारी 2024 मध्ये ती यूकेमध्ये होती जिथे तिने मुलाला जन्म दिला. आता या गोष्टींमुळे अनुष्का तिच्या कुटुंबासोबत कायमची यूकेला शिफ्ट होऊ शकते, असा अंदाज लोक बांधत आहेत. मुलाच्या जन्मानंतर कोहली पहिल्यांदाच भारतात दिसला. तो 22 मार्च 2024 रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील आयपीएल सामन्याचा भाग असणार आहे.

विराट भारतात परतला

विराट भारतात पोहोचला तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या पापाराझींनी त्याला विचारलं की अनुष्का कुठे आहे?. विराट कोहली आयपीएलसाठी भारतात आला आहे. पण आयपीएल संपल्यानंतर तो पुन्हा यूकेला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही लोकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

शहांसोबतच्या भेटीबाबत बाळा नांदगावकरांनी दिली महत्त्वाची माहिती!

अमोल कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?; दिलीप वळसेंच्या बंगल्यावर खलबतं

जावेद अख्तर यांचा पहिल्या लग्नाबाबत मोठा खुलासा!

अभिनेत्री समंथा प्रभूच्या ‘त्या’ वक्तव्याने सिनेसृष्टी हादरली, नेमकं काय घडलं?

महेंद्रसिंग धोनीने मारला आयकॉनिक ‘हेलिकॉप्टर शॉट’! व्हिडीओ व्हायर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now