IPL 2025 Streaming l जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2025) 18 वा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. पहिला सामना गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर होणार आहे. IPL चे सामने पाहण्यास उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे – यंदा IPL मोफत पाहता येणार का?
2023 आणि 2024 च्या हंगामांमध्ये प्रेक्षकांना जिओ सिनेमावर मोफत IPL स्ट्रीमिंगचा आनंद घेता आला होता. मात्र 2025 च्या हंगामात काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामासाठी प्रेक्षकांना थोडं नियोजन करूनच सामने पाहावे लागतील.
IPL 2025 लाईव्ह स्ट्रीमिंग : कुठे आणि कसं पाहाल? :
IPL 2025 चे थेट प्रक्षेपण टीव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध असणार आहे.
टीव्ही ब्रॉडकास्ट: सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट पाहता येतील.
ऑनलाइन स्ट्रीमिंग: यंदा सामने जिओहॉटस्टार (JioHotstar) अॅप आणि वेबसाइटवर पाहता येणार आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, यंदा जिओहॉटस्टारवर IPL पाहण्यासाठी प्रेक्षकांना पेड सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. म्हणजेच, IPL 2025 चे लाईव्ह स्ट्रीमिंग पूर्णपणे मोफत नसेल.
IPL 2025 Streaming l कोणते संघ आणि किती सामने? :
IPL 2025 मध्ये एकूण 10 संघ सहभागी आहेत आणि 65 दिवसांच्या कालावधीत 74 सामने खेळवले जाणार आहेत. या सामन्यांमध्ये 12 डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) असतील.
चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ पाच वेळा IPL विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सने तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. यंदाच्या मोसमात कोणता संघ बाजी मारणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.






