धनंजय मुंडेंचं टेन्शन वाढलं; ‘या’ कारणामुळे मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार?

On: December 21, 2024 11:38 AM
Dhananjay Munde
---Advertisement---

Dhananjay Munde l राज्यभरात केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याप्रकरण प्रचंड तापले आहे. कारण या हत्येचे पडसाद विधासभेच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले आहेत. अशातच सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात संपूर्ण घटनाक्रम सांगितला. तसेच या हत्येप्रकरणात कोणाचाही हात असल्याचं त्याच्यावर कठोर कारवाई होणार असल्याचं फडणवीसांनी म्हंटल आहे.

धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार? :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातील कोणत्याही राजकीय नेत्याबरोबर संबंध असले तरी देखील त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई केली जाणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. मात्र त्यांच्या या इशाऱ्यानंतर आता मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

मात्र आता या चर्चेनंतर आज मंत्री धनंजय मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. कारण आज सकाळच्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी देखील दाखल झाले आहेत. मात्र आता या भेटीनंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात ठेवायचे की नाही? यासंदर्भात चर्चा होण्याची दाट शक्यता आहे.

Dhananjay Munde l वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधी पक्षातील नेत्यांनी वाल्मिक कराडचं नाव घेतं आमदार धनंजय मुंडे यांना देखील लक्ष्य केलं होतं. कारण वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र आता याच कारणामुळे विरोधकांनी आमदार धनंजय मुंडे यांना अधिवेशनात टार्गेट केल्याने त्यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याचं दिसत आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार आहे. मात्र आता या भेटी दरम्यान नेमकं काय घडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

News Title – Will Dhananjay Munde be dropped from the cabinet?

महत्त्वाच्या बातम्या-

तुम्ही रॉयल्टी चोरी करता, तोंड काळ का केलं? भाजपच्या ‘या’ नेत्याचा खडसेंना सवाल

मराठी कुटुंबाला मारहाण करणाऱ्या शुक्लाला पोलिसांकडूनच VIP ट्रीटमेंट?, मोठा खुलासा समोर

बीडचं राजकारण तापणार?, शरद पवार आज मस्साजोग दौऱ्यावर

“माझ्या बाबांना ज्या प्रकारे मारलं, तशीच शिक्षा…”; संतोष देशमुखांच्या मुलीचा टाहो

इंधनदरात दिलासा! पेट्रोल ‘इतक्या’ रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या लेटेस्ट दर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now