बुमराहच्या अनुपस्थितीत अर्जुन तेंडुलकर ठरणार गेमचेंजर?, MI ची मोठी मास्टरखेळी

On: March 21, 2025 11:11 AM
Arjun Tendulkar Play MI vs CSK IPL 2025 Opener 
---Advertisement---

IPL 2025 | आयपीएल 2025 स्पर्धेतील मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला पहिल्याच सामन्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागणार आहे. 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) विरुद्ध होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्यात मुंबईकडून जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे संघात अर्जुन तेंडुलकरला (Arjun Tendulkar) संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (IPL 2025)

हार्दिक आणि बुमराहची अनुपस्थिती – मुंबईसमोर डोंगराएवढं आव्हान

हार्दिक पांड्याला मागच्या हंगामातील स्लो ओव्हररेट प्रकरणामुळे पहिल्या सामन्यातून वगळण्यात आलं आहे, तर बुमराह अद्याप दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. वेगवान गोलंदाजीच्या आघाडीवर मोठी पोकळी निर्माण झाल्याने, अर्जुन तेंडुलकरसारख्या अष्टपैलूला संधी देण्याचा विचार मुंबई व्यवस्थापन करत आहे.

अर्जुन तेंडुलकरला मिळणार संधी?  

अर्जुन डावखुरा जलद गोलंदाज असून, उत्तम फलंदाजी क्षमताही बाळगतो. चेन्नईसारख्या अनुभवी संघाविरुद्ध खेळताना, बॅलन्स ठेवण्यासाठी अष्टपैलू खेळाडू अत्यावश्यक असतो. बुमराहच्या अनुपस्थितीत अर्जुन हा एक चांगला सामर्थ्यवान पर्याय ठरू शकतो.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग XI

  1. रोहित शर्मा
  2. विल जॅक्स
  3. तिलक वर्मा
  4. सूर्यकुमार यादव (कर्णधार)
  5. नमन धीर
  6. रॉबिन मिंज (विकेटकीपर)
  7. कॉर्बिन बॉश
  8. मिचेल सँटनर
  9. दीपक चाहर
  10. अर्जुन तेंडुलकर
  11. ट्रेंट बोल्ट

इम्पॅक्ट प्लेयर नियम मुंबईला मिळवून देऊ शकतो फायदा

मुंबई संघ इम्पॅक्ट प्लेयर नियमाचा योग्य वापर करून खेळाडूंच्या कमतरतेवर मात करू शकतो. अर्जुन तेंडुलकर हा गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही बाजूंनी प्रभावी ठरू शकतो, त्यामुळे त्याचं “X Factor” म्हणून योगदान” अपेक्षित आहे. (IPL 2025)

Title : Will Arjun Tendulkar Play MI vs CSK IPL 2025 Opener 

 

Join WhatsApp Group

Join Now