धनुष्यबाण कोणाचा? यावर निवडणूक आयोगात पुन्हा सुनावणी

On: January 17, 2023 10:51 AM
---Advertisement---

मुंबई | शिंदेंच्या(Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत(Shivsena) मोठी फूट पडली. शिंदे आणि ठाकरे(Uddhav Thackeray) असे शिवसेनेचे सध्या दोन गट पाहायला मिळत आहेत. सध्या खरी शिवसेना कोणाची आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण कोणाचा यावर वाद सुरू आहे.

गेल्या चार महिन्यांपासून शिवसेना कोणाची हा वाद सुरू आहे. यावर मंगळवारी निवडणूक आयोगामध्ये पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. मंगळवारच्या या सुनावणीकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

गेल्या मंगळवारी म्हणजेच 10 जानेवारीला शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला होता. या सुनावणीत शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंचे पक्षप्रमुखपदच बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आला होता.

सर्वोच्च न्यायालय सत्ता संघर्षावर निर्णय देईपर्यंत ठाकरेंच्या पक्षप्रमुखपदाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी ठाकरे गटाकडून मागच्या निवडणूक आयोगातील सुनावणीदरम्यान करण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now