‘अण्णा माझे दैवत…’ म्हणणारा बीडचा गोट्या गीते कोण?

On: January 10, 2025 2:46 PM
Gotya Gite
---Advertisement---

Gotya Gite l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दिवसेंदिवस वेगळं वळण घेत आहे. अशातच या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या तुरुंगात आहे. मात्र आता वाल्मिक कराड हा CBI कोठडीत असतानाच त्याचे समर्थक सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ पोस्ट शेअर करत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच आता या समर्थकांमध्ये गोट्या गीते हा चांगलाच चर्चेत आला आहे.

‘अण्णा माझे दैवत, सदैव सोबत’ :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा सध्या CBI कोठडीत आहे. मात्र कराडचे समर्थक सोशल मीडियावर त्याच्या समर्थनार्थ पोस्ट करत असल्याचं दिसून येत आहे. अशातच बीडच्या गोट्या गीतेनं सोशल मीडियावर एक रील शेअर केली आहे. मात्र त्या रिलच्या कॅप्शनने राजकीय नेतेमंडळींचं देखील लक्ष वेधलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gotu gitte (@gotu.gitte)

मात्र गोट्या गीतेने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या एका रिलच्या कॅप्शनमध्ये लिहलं आहे की, ‘अण्णा माझे दैवत, सदैव सोबत’. मात्र त्याची ही रील प्रचंड व्हायरल झाली आहे. तसेच गोट्या गीतेवर बीडमध्ये अनेक गुन्हे दाखल असून काही गंभीर गुन्हे सुद्धा गोट्या गीतेवर आहेत. याशिवाय गोट्यावर पुण्यातही एक गुन्हा दाखल आहे.

Gotya Gite l गोट्या गीते कोण आहे? :

गोट्या गीते हा वाल्मिक कराडचा अत्यंत विश्वासू सहकारी असल्याचं बोललं जात आहे. तसेच वाल्मिक कराडच्या माध्यमातून त्याची मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत जवळीक असल्याचं देखील म्हटलं जात असून, ज्ञानोबा उर्फ (गोट्या) मारुती गीते असं त्याचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, गोट्या गीते हा परळीतील नंदागौळ या ठिकाणचा रहिवाशी आहे. तसेच गोट्या गीते हा मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या जवळचा आहे का? असा सवाल आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. याशिवाय गीते मतदान करत असतानाचा त्याचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत याला बूथ कॅप्चर म्हणायचे का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

News Title : Who is gotya gite

महत्वाच्या बातम्या –

“…तर सरपंच देशमुखांचे प्राण वाचले असते”; खळबळजनक खुलासा समोर

तुम्हालाही कुंभमेळ्याला जायचंय?; पुण्यातून धावणार विशेष ट्रेन, पाहा तिकीट दर

आरोपींना पोलीसच वाचवताय?, ‘त्या’ हत्याप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप

थंडीत पाऊसही लावणार हजेरी, पाहा राज्यात कुठे-कुठे बरसणार?

बारावीच्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट, अशाप्रकारे करा डाऊनलोड

 

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now