दिल्लीच्या विजयाचा हिरो आशुतोष शर्मा कोण आहे?

On: March 25, 2025 10:18 AM
Ashutosh Sharma
---Advertisement---

Ashutosh Sharma l आयपीएलच्या एका थरारक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सवर एका विकेटने विजय मिळवला, आणि या विजयाचा हिरो ठरला आशुतोष शर्मा. 210 धावांच्या आव्हानासमोर दिल्लीचा निम्मा संघ परतला असताना, इम्पॅक्ट प्लेअर म्हणून मैदानात आलेल्या आशुतोषने ३१ चेंडूत ६६ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. त्याच्या खेळात 5 चौकार आणि 5 षटकारांचा समावेश होता.

गेल्या मोसमातही केली होती चमकदार कामगिरी :

मात्र, आशुतोषसाठी हा यशाचा क्षण सहज आलेला नाही. काही काळापूर्वी एका कोचमुळे त्याला संघाबाहेर जावं लागलं होतं. यामुळे तो नैराश्यात गेला होता. पण जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्याने पुनरागमन केलं आणि आता IPL च्या मंचावर चमकताना दिसतो आहे.

आशुतोषचं नाव IPL चाहत्यांना नवीन नाही. 2024 साली तो पंजाब किंग्स संघात होता आणि गुजरात जायंट्स विरुद्ध शानदार खेळी करत त्याने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. त्यावेळीही त्याने शशांक सिंगसोबत भागीदारी करत सामना पलटवला होता.

Ashutosh Sharma l कोण आहे आशुतोष शर्मा? :

जन्म: 15 सप्टेंबर 1998, रतलाम, मध्य प्रदेश

भूमिका: उजव्या हाताचा फलंदाज आणि पार्ट टाईम गोलंदाज

देशांतर्गत संघ: मध्य प्रदेश

क्रिकेट कारकिर्द: अंडर-16 पासून सुरूवात करून आजवर सातत्याने प्रदर्शन

आशुतोष शर्मा हा फक्त एक इम्पॅक्ट प्लेअर नाही, तर एक उदयोन्मुख मॅच विनर आहे. त्याची मेहनत, चिकाटी आणि संकटात सावरण्याची ताकद आजच्या तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारी ठरते.

News Title: Who is Ashutosh Sharma? The Impact Player Who Scripted Delhi Capitals

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now