Weight loss solution | बदलत्या जीवनशैलीमुळे आता आरोग्याच्या देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सध्याच्या घडीला व्यक्तीची शारीरिक हालचाल खूपच कमी झाली आहे. शिफ्टमध्ये काम करत असताना शरीराची जास्त हालचाल होत नाही. बराच वेळ लॅपटॉपसमोर बसून काम करावे लागते. त्यातच जेवणाच्या वेळा आणि पद्धती यामध्ये देखील बदल झाला आहे. या सर्व गोष्टींचा आपल्या शरीरावर खूप परिणाम होतो. सध्या अतिजास्त वजन असणे, ही एक समस्याच बनली आहे. (Weight loss solution)
वजन कमी करण्यासाठी काही जण महागडी औषधे खातात तर काही जण हे जीम लावतात. पण, याने म्हणावं तितका फरक दिसून येत नाही. वजन कमी करण्यासाठी आहाराचे नियोजन आणि व्यायाम या गोष्टींचा समतोल असणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर आपण काय खातोय, काय पितोय याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. या लेखात तुम्हाला वजन करण्याचा एक सोपा मार्ग सांगणार आहोत.
वजन कमी करण्यासाठी आणि विशेषत: निरोगी राहण्यासाठी बरेच जण ग्रीन टीचे सेवन करतात. मात्र, ग्रीन टी प्यायची असेल तर त्यात काही गोष्टी मिसळून प्यायला हव्यात. यामुळे त्याचा डबल फायदा होतो. यामुळे ग्रीन टीची चव सुधारण्यास मदत होईलच शिवाय आरोग्यासाठी अनेक फायदे देखील मिळतील. (Weight loss solution)
पचनक्रिया सुधारण्यासाठी ग्रीन टी प्यायची असेल तर त्यात या 3 गोष्टी मिसळून प्यायला हवी. अनेक चवीचे ग्रीन टी बाजारात उपलब्ध असले तरी नैसर्गिकरित्या बनवलेला ग्रीन टी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरतो. आता कोणत्या गोष्टी ग्रीन टीमध्ये मिसळल्यास वजन कमी होईल, त्याबाबत जाणून घेऊयात.
ग्रीन टीमध्ये ‘या’ गोष्टी मिसळून प्या
ॲपल सायडर व्हिनेगर : ॲपल साइडर व्हिनेगरची चव थोडी आंबट-गोड असते. ग्रीन टीमध्ये ते घातल्यास ग्रीन टीचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. बहुतेक लोक वजन कमी करण्यासाठी ॲपल साइडर व्हिनेगर पितात.
लिंबाचा रस : लिंबाचा रस ग्रीन टीचे अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म वाढवतो. ज्यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी होतो. यामुळे वजन लवकर कमी होण्यास मदत होते. (Weight loss solution)
लाल द्राक्षे : ग्रीन टी बनवताना एक द्राक्ष पाण्यात उकळून मग त्यात ग्रीन टी घाला. यामुळे द्राक्षांचा गोडवा आणि चव पाण्यात विरघळते. यामुळे ग्रीन टीचा कडवटपणाही कमी होईल आणि तुमची चरबी वेगाने वितळेल.
ग्रीन टी नेमकी कधी प्यावी?
ग्रीन टीचे तुम्ही सकाळी सेवन केले तर तुम्हाला अधिक फायदे होतील. याशिवाय ग्रीन टी अन्न खाण्यापूर्वी आणि खाल्यानंतर फक्त 45 मिनिटांनी प्यावी. सकाळी रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे टाळावे.यामुळे नुकसान होऊ शकते. (Weight loss solution)
News Title – Weight loss solution
महत्त्वाच्या बातम्या-
निवडणुकीपूर्वीच अजित पवारांना जोर का झटका; ‘हा’ बडा नेता फुंकणार तुतारी?
ऐश्वर्या राय आणि सलमानबद्दल ‘या’ अभिनेत्रीकडून आतापर्यंतचा सर्वात मोठा खुलासा!
एअरटेलने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! सर्वात स्वस्त प्लॅन लाँच
पुणे हादरलं! मध्यरात्री 1 वाजता दरवाजा ठोठावला अन्…; पुढचा घटनाक्रम ऐकून थरथराल
महाराष्ट्रात 3 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु, ‘या’ जिल्ह्यांना जोडणार






