Weather Update | राज्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडासह विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाने नाले, नद्या दुधडी भरून वाहत आहेत. तर, शहरी भागात पावसामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. (Weather Update)
आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, वाशिम, वर्धा, बुलढाणा, चंद्रपूर, अकोला या सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने राज्यात पुढील 4 दिवस जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने आज 25 सप्टेंबररोजी रायगड आणि पुण्याला रेड अलर्ट जारी केला आहे. पुण्यासह घाटमाथ्यावर आणि संपूर्ण जिल्ह्याला ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे.(Weather Update)
पुणे शहरात 60 ते 100 मिमीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच, 26 व 27 सप्टेंबर रोजी पुण्याला ‘यलो अलर्ट’देण्यात आला आहे. हवामान विभागाने मराठवाडा आणि विदर्भाला देखील जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे.
‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
आज मुंबईसह, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, अहमदनगर आणि वाशीमसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याचा वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. कालपासून मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Weather Update)
News Title : Weather Update today 25 september
महत्वाच्या बातम्या-
ऑक्टोबर महिन्यात ‘या’ राशींचं नशीब फळफळणार, शनीदेव करणार धनवर्षाव
सोनं झालं महाग, भाव गेला 80 हजारांवर?; जाणून घ्या आजचे लेटेस्ट दर
उर्मिला मातोंडकरचा संसार मोडणार, लग्नाच्या 8 वर्षांनी घेणार घटस्फोट?
अक्षय शिंदेच्या मृत्यूचं खरं कारण समोर, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
आज ग्रहमान कोणत्या राशीला साथ देतील?, वाचा मेष ते मीनचे राशीभविष्य






