Weather Update | राज्यात सध्या विविध भागामध्ये जोरदार पाऊस बरसत आहे. काही भागात मुसळधार तर कुठं हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळत आहे. रविवारी मुंबईसह बऱ्याच ठिकाणी पावसाने झोडपून काढले. यामुळे पिकांचे देखील बरंच नुकसान झालं आहे.
अशात पुढील तीन पुन्हा दमदार पाऊस (Weather Update) पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आज मुंबई, ठाणे, रागयड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट
तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासोबतच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसह संपूर्ण विदर्भात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या भागातील नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. मागील दोन दिवसांत पडलेल्या पाऊसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यातील शेतकर्यांचं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 17 महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने जवळपास 11 हजार हेक्टरवरील पिकाचे नुकसान झालं (Weather Update)आहे.
मुसळधार पावसाने शेतीचं प्रचंड नुकसान
तसंच जवळपास पंधरा हजार शेतकऱ्यांना या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. एकीकडे पश्चिम विदर्भाला पावसाने झोडपून काढले असताना पूर्व विदर्भ मात्र अद्याप जोरदार पावसाची वाट बघत आहे.
दुसरीकडे ज्या भागात चांगला पाऊस झालाय, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी पेरण्या उरकल्या आहेत. तर काही भागात अद्यापही पेरण्या झाल्या नाहीत. त्यामुळे शेतकरी अजूनही चांगल्या (Weather Update)पावसाची वाट बघत आहे.
News Title – Weather Update today 10 july
महत्त्वाच्या बातम्या-
पती रणवीर सिंहसमोरच ओरीने दीपिकासोबत केलं असं काही की..; फोटो पाहून चाहते हैराण
“सगेसोयऱ्यांचा जीआर काढल्यास मुंबई जाम करू”; लक्ष्मण हाकेंचा सरकारला इशारा
“मराठा आणि धनगर समाज यांच्यात…”; जरांगे पाटलांनी घेतली धनगर उपोषणकर्त्यांची भेट
बद्रीनाथमधील पातालगंगा टनलजवळ भूस्खलन, राष्ट्रीय महामार्ग झाले बंद; पाहा थरारक Video
वरळी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शाह यांची शिवसेनेतून हकालपट्टी!






