Weather Update | महाराष्ट्रातील ‘हा’ जिल्हा गारठला, आणखी थंडी वाढण्याचा हवामान खात्याचा इशारा

On: December 21, 2023 11:44 AM
weather update
---Advertisement---

Weather Update | महाराष्ट्रात थंडी चांगलीच वाढल्याचं चित्र पहायला मिळत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडीने डोकं वर काढलं आहे. राज्याच्या (Maharashtra) काही भागात थंडीचा पारा देखील घसरला आहे. दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये थंडीचा कडाका आणखी जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यासह देशातील काही भागांमध्ये तापमानात (Weather Update) अचानक बदल झाला आहे. राज्यात काही ठिकाणी गारठा सुरु झाला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. मात्र, हिंगोली जिल्ह्यातील थंडीचा पारा घसरल्याने नागरिकांनी पहाटे घराबाहेर पडणं बंद केलं आहे.

हिंगोलीत थंडी वाढली-

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीमध्ये 12 ते 13 अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्याचे तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस असल्यामुळे नागरिक सकाळ सकाळ चालताना, धावताना पाहायला मिळत आहेत. तर जागोजागी शेकोट्या पेटलेल्या आहेत.

राज्याच्या तापमानात घट-

राज्यातील कमाल तापमानात घट होण्याची शक्यता असून त्यानंतर राज्यातील (Weather Update) थंडी वाढणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

डिसेंबरच्या महिन्याअखेरीस किमान तापमानात घट होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. शिवाय थंडीची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. उत्तर भारतात सध्या थंडीची प्रचंड लाट पसरली आहे.

चादरी काढा, 48 तासात वाढणार थंडी

पुढील पाच दिवस राज्यातील हवामान कोरडं राहणार असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळं 48 तासांमध्ये राज्यातील किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. परिणामी थंडीचा कडाका आणखी जाणवू शकतो.

News Title : weather update maharashtra temprature will be decreased

थोडक्यात बातम्या-

Corona Virus Update | पुन्हा धोका वाढला, महाराष्ट्रानं सुरु केली ‘ही’ महत्त्वाची तयारी!

Milk Farmers | दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर!

Pune News | पुण्यात धक्कादायक प्रकार, भाजप नेत्यानं रेल्वेखाली उडी मारुन आयुष्य संपवलं

Weather Alert | ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडी वाढणार, हवामान विभागाचा इशारा

Ajit Pawar | जयंत पाटलांच्या वक्तव्याने सभागृहात वातावरण पेटलं, अजितदादा उठले अन्…

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now