राज्यात ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा येलो अलर्ट जारी

On: June 17, 2024 7:42 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update | राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर राज्याच्या काही भागात हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल जाणवत आहे. राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे. तसेच काही भागात अद्यापही पावसाचे आगमन झाले नाही. उष्णतेने होरपळून गेलेले पावसाची वाट पाहत आहेत. (Weather Update)

मराठवाडा, आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी

अशातच आता आज मराठवाडा, आणि विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन हे प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. काही भागात तीन ते चार दिवसांआधी पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोकणासह मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता कमी आहे. (Weather Update)

राज्यातील काही भागांमधील वातावरण हे ढगाळ राहणार आहे. कोकणात फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामुळे पावसाची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Update)

सध्या मान्सूनने कोकण, मध्य महाराष्ट्र विभाग व्यापलेला आहे. तर विदर्भाच्या काही भागात म्हणजे पश्चिम विदर्भात मान्सून सक्रिय झाला असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अजूनही संपूर्ण विदर्भामध्ये पाऊस झाला नसल्याची माहिती हवामान खात्याने (Weather Update) माहिती दिली आहे.

पावसामुळे शेती कामांना वेग

विदर्भात मान्सूनच्या प्रगतीला ब्रेक लागला आहे. पुढच्या दोन ते तीन वर्षांमध्ये मान्सून संपूर्ण विदर्भामध्ये दाखल होणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान ज्या भागात पाऊस झाला आहे त्या भागात शेती कामांना वेग आला आणि खरीपाची पेरणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. (Weather Update)

News Title – Weather Update Maharashtra In Yellow Alert

 

Join WhatsApp Group

Join Now