Weather Update | एप्रिल महिना तसा कडाक्याच्या उन्हाचा असतो. पण राज्यात कुठे पाऊस तर कुठे तीव्र ऊन पडत आहे. मागच्या आठवड्यात काही भागात मुसळधार पाऊस पडला. तर मराठवाडा आणि विदर्भात तापमान प्रचंड वाढलंय. आता संपूर्ण एप्रिल महिन्यात वातावरण कसं असणार याबाबत हवामान विभागाने मोठी अपडेट दिली आहे.
पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील चार दिवस हवामान कोरडं राहील. त्यानंतर मात्र तापमानात मोठी वाढ होणार आहे. मराठवाड्यामध्ये नांदेड आणि लातूर येथे आज व उद्या रात्रीही प्रचंड उकाडा जाणवेल.
तसंच मध्य महाराष्ट्रात सोलापूर येथेही उकाडा वाढेल. विदर्भात अकोला व चंद्रपूर येथे 5 एप्रिलला व यवतमाळला 4 एप्रिलला उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय.
पुण्यात हवामान कसं राहील?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुणे (Weather Update pune) व परिसरात पुढील काही दिवस आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे. तर वातावरण कोरडे राहील. काल येथे 39.8 डिग्री सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली तर 20 डिग्री सेल्सिअस एवढ्या कीमान तापमानाची नोंद झाली आहे.
‘या’ भागांना इशारा
विदर्भात पुढील तीन दिवस हवामान (Weather Update ) कोरडे राहील. 11 जिल्ह्यात असं हवामान राहील. अकोला, यवतमाळ व चंद्रपूर जिल्ह्यात 4 एप्रिलला तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 2 ते 3 अंश सेल्सिअसने कमाल तापमान वाढणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घ्यावी, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
राज्यात पहिला उष्माघाताचा बळी मराठवाड्यात गेला आहे. त्यामुळे उष्माघातापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी पिण्याबरोबरच, दुपारी बाहेर पडणे टाळावे असं हवामान विभागाने म्हटलं. पुढील दोन ते तीन दिवस तापमानात प्रचंड वाढ होऊन उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.
News Title- Weather Update in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबईच्या पराभवाची हॅटट्रिक! हार्दिक चाहत्यांच्या निशाण्यावर, रोहितच्या कृतीनं मन जिंकलं, Video
हार्दिकसाठी चीअर करण्याचं आवाहन; पण पांड्याची झाली फजिती, नेमकं काय घडलं?
रोहितचा फॅन थेट मैदानात शिरला; हिटमॅनलाही धक्का बसला, सर्वांची उडाली धांदल, Video
‘मुंबईचा राजा रोहित शर्मा’, वानखेडेवर क्रिकेट चाहत्यांची घोषणाबाजी
आचार्य चाणक्यांनी सांगितल्या प्रमाणे करा दिवसाची सुरुवात; होईल फायदाच फायदा






