Budget 2024 | अर्थसंकल्पाच्या दिवशी ‘या’ शेअर्सवर द्या लक्ष; तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

On: February 1, 2024 9:32 AM
Budget 2024
---Advertisement---

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सलग सहाव्यांदा अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहे. त्या आर्थिक वर्ष 2024-25 साठी पहिल्यांदा अंतरिम बजेट (Budget 2024) सादर करतील. बजेटकडे सर्वांचं लक्ष आहेच त्यासोबत गुंतवणूकदार देखील दुसरीकडे शेअर बाजारावर लक्ष ठेवून आहेत.

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली होती. 31 जानेवारीला सेन्सेक्स 612 अंकांच्या वाढीसह 71752 अंकांवर तर निफ्टी 203 अंकांच्या वाढीसह 21725 अंकांवर बंद झाला. आता बजेटमध्ये सरकारच्या काही निर्णयांमुळे मार्केटवर परिणाम होऊ शकतो. अशात बाजार तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना महत्त्वाचा सल्ला दिलाय.

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी काही शेअर्सने उसळी घेतली होती. यात रेल्वे सेक्टरचाही समावेश आहे. रेल्वे सेक्टरमध्ये तेजीचे वारे आले आहे. त्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरने उसळी घेतली.

मार्केट गुरू अनिल सिंघवी गोदरेज कंझ्युमर्स फूट खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. 1155 रुपयांच्या स्टॉपलॉससह शेअर खरेदी करा. शेअरवर 1180 रुपये आणि 1200 रुपये उद्दिष्ट आहे. कंपनीने FMCG क्षेत्रात जबरदस्त निकाल जाहीर केले आहेत. भारताची वाढ 5% होती. त्यामुळे शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

बाजाराला बजेटकडून कमी अपेक्षा असल्या तरी, बुधवारी भारतीय बाजारांमध्ये वाढ झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. कर संकलनात वाढ झाल्यामुळे वित्तीय तूट कमी राहण्याची अपेक्षा आहे.

Budget 2024 | आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

डॉ रेड्डी (DREDDY), आयशर मोटर्स (EICHERMOT), सनफार्मा (SUNPHARMA), टाटा मोटर्स (TATAMOTORS), डिव्हिस लॅब (DIVISLAB), व्होल्टास (VOLTAS), बंधन बँक (BANDHANBNK), भारतीय कंटेनर निगम (CONCOR), भारत फोर्ज (BHARATFORG), एचडीएफसी एसेट मॅनेजमेंट कंपनी (HDFCAMC)

महत्त्वाच्या बातम्या- 

Amitabh Bachchan: श्रीदेवीचा होकार मिळावा म्हणून अमिताभ यांनी उधळली होती ट्रकभर गुलाबाची फुलं

Cosmetic Clash: मेकअपच्या सामानावरुन सासू-सुनेत भांडण, सुनेनं उचललं धक्कादायक पाऊल

Nagpur News: नागपुरात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार, वासनांध शिक्षकाने…

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटलांकडून नवी घोषणा, तारीख सुद्धा केली जाहीर!

Kalyan News: मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांचं टेन्शन वाढलं, स्वतःच्या मतदारसंघातच पराभवाचा झटका बसणार?

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now