“वाल्मिक कराड रोज 1 कोटी घरी घेऊन जायचा, पैसे जमले नाही तर हातपाय तोडायचा”

On: December 29, 2024 6:22 PM
Valmik Karad
---Advertisement---

Walmik Karad | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात नवनवे वळणे समोर येत आहेत. या प्रकरणाचा तपास चालू असताना, शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर (Walmik Karad) गंभीर आरोप केले आहेत.

उत्तम जानकरांचा गंभीर आरोप

उत्तमराव जानकर यांनी पत्रकार परिषदेतून वाल्मिक कराडवर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितलं की वाल्मिक कराड रोज 1 कोटी रुपये घरी घेऊन जायचा. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. जानकर यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांचाही संबंध असल्याचा दावा केला आहे आणि त्यांचा ‘कर्ता करविता’ असल्याचं म्हटलं आहे.

राजकीय कनेक्शन समोर

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचे राजकीय कनेक्शन समोर आलं आहे. वाल्मिक कराड, जो मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय आहे, सध्या फरार आहे. या प्रकरणाच्या तपासात CIDने वाल्मिक कराडच्या पत्नीला चौकशीसाठी बोलावलं आहे.

उत्तम जानकर यांनी वाल्मिक कराडच्या आर्थिक बाबतीतही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते, वाल्मिक कराडची आर्थिक स्थिती इतकी मजबूत कशी झाली आहे, हे समजण्यासाठी तपास आवश्यक आहे. रोज 1 कोटी रुपये घरी घेऊन जाण्याच्या आरोपांनी वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘हातपाय तोडायची सुपारी पण…’; सतीश वाघ हत्याकांड प्रकरणातील धक्कादायक खुलासा समोर!

संतोष देशमुखांना मारताना 16 कॉल केले; धक्कादायक खुलासा समोर

संतोष देशमुख हत्या प्रकरणी CID तपासात धक्कादायक माहिती समोर!

लाडकी बहिण योजना बंद होणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट!

होमिओपॅथी डॉक्टरांसाठी खूशखबर, अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासंदर्भात मोठा निर्णय

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now