वाल्मिक कराडकडे कोट्यवधींची संपत्ती, आकडा पाहून अधिकारीही थक्क

On: January 7, 2025 12:37 PM
Walmik Karad Property
---Advertisement---

Walmik Karad Property l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणामध्ये संबंधित खंडणी मागितल्याने वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केली आहे. वाल्मिक कराड हा 31 डिसेंबर 2024 रोजी पोलिसांना शरण आला आहे. त्यानंतर केज न्यायालयाने कराडला 15 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अशातच आता वाल्मिक कराडसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडला यापूर्वीच ईडीकडून नोटीस देण्यात आली होती. त्यामुळे वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत.

धनंजय मुंडे यांनी हावरटपणाचे राजकारण केले :

बीडमध्ये वाल्मिक कराडने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली आहे. तसेच त्याने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून प्रचंड पैसा गोळा केल्याचं अनेक आंदोलनांच्या भाषणांमधून देखील सांगितलं आहे. मात्र याचदरम्यान आमदार सुरेश धस यांनी अगदी सविस्तरपणे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड नेमकं कसं घडलं आणि वाल्मिक कराडकडून खंडणी कशी मागितली जाते याबद्दलची माहिती जाहीर कार्यक्रमांमध्ये देखील दिली आहे.

आमदार सुरेश धस धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधला आहे. धनंजय मुंडे यांनी हावरटपणाचे राजकारण केलं आहे. तसेच धनंजय मुंडेंनी वाळुतून, राखेतून पैसा कमावला आहे. याशिवाय घरकुलांसाठी त्यांनी 10-10 हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप देखील सुरेश धस यांनी केला आहे.

Walmik Karad Property l वाल्मिक कराडची संपत्ती किती? :

दरम्यान, सुरेश धस यांनी वाल्मिक कराडने तब्बल 1500 कोटींची संपत्ती जमवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. तसेच याच संपत्तीसंदर्भातील चौकशीसाठी ईडीची दोन महिन्यांपूर्वीच वाल्मिक कराडला नोटीस आल्याचं देखील धस यांनी म्हटलं आहे. म्हणजेच वाल्मिक कराडचे संपत्ती आकड्यात सांगायचं झालं तर 1500,000,00,00,000 इतकी आहे.

मात्र आमदार धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्तीबद्दल केलेल्या दाव्यासंदर्भात खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बजरंग सोनावणे म्हणाले की, “सुरेश धस हे पाचव्या टर्मचे आमदार आहेत, त्यामुळे ते अभ्यास करून बोलणारे नेते आहेत. तसेच त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलले असतील. त्यामुळे आता शासनाने आणि पोलीस यंत्रणेने त्या गोष्टी तपासला पाहिजे” असं बजरंग सोनावणे म्हणाले आहेत.

News Title : Walmik Karad Property

महत्वाच्या बातम्या –

पंकजा मुंडेंना कोणी पाडलं? सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

राज्यात पुन्हा होम क्वारंटाईन, आयसोलेशन वॉर्ड?; धक्कादायक बातमी समोर

तुमचे सगळेच बुरखे काही महिन्यांतच फाटले; राऊतांचा सरकारवर निशाणा

धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, SIT बरखास्त करून…; मुख्यमंत्र्यांकडे थेट मागणी कुणी केली?

आनंदवार्ता! आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं झालं स्वस्त, काय आहेत सध्या दर?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now