अखेर त्याने तोंड उघडलं! वाल्मिक कराडने मागितली तब्बल ‘इतक्या’ कोटींची खंडणी

On: January 3, 2025 4:36 PM
Walmik Karad
---Advertisement---

Walmik Karad l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाने राज्यात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला आहे. कारण पवनचक्की खंडणी प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे याच्या अडचणीत देखील आता मोठी वाढ झाली आहे. कारण विष्णू चाटे याने एक खळबळजनक माहिती दिली आहे. वाल्मिक कराडने खंडणीसाठी पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधल्याची थेट कबुली विष्णू चाटे याने दिली आहे.

वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ :

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासह पवनऊर्जा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी उकळण्याच्या प्रकरणात विष्णू चाटे हा आरोपी पोलिस कोठडीत आहे. मात्र पोलीस कोठडीत विष्णू चाटे याची कसून चौकशी सुरू आहे. कारण या चौकशीत विष्णू चाटे याने वाल्मिक कराडने माझ्या फोनवरून पवनऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्यांशी खंडणीसंदर्भात बोलणी केल्याची थेट कबुली दिली आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे आता या प्रकरणाचा तपास करणाऱ्या गुन्हे अन्वेषण विभागाने कोर्टात सादर केलेल्या प्राथमिक अहवालाद्वारे हा धक्कादायक खुलासा झाला आहे. त्यामुळे आता वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Walmik Karad l विष्णू चाटेनी दिली कबुली? :

आरोपी विष्णू चाटेनी दिलेल्या कबुलीत म्हटलं आहे की, वाल्मिक कराडने पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवर संभाषण केले होते. त्यावेळी वाल्मिक कराडने आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना तब्बल दोन कोटींची खंडणी देखील मागितली होती.

मात्र यासंदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा देखील दाखल केला होता. त्यामुळे विष्णू चाटे याने स्वत: कराड यांना फोन लावून पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणे करुन दिल्याची कबुली दिली आहे. तसेच आता CID च्या रिमांड कॉपीमध्ये देखील तसा उल्लेख केला आहे.

News Title – walmik demanded a ransom of 2 crores from vishnu chate phone cid remand

महत्त्वाच्या बातम्या-

तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य यादी आली समोर

वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना ‘या’ जिल्ह्यात हलवा; भाजप आमदाराने केली मागणी

ऐकावं ते नवलच!, पुण्यात फक्त ३०० रुपयांत केलं लग्न

अजित पवारांना अडकवण्याचा कराडचा प्लॅन?, बड्या नेत्याच्या आरोपांनी खळबळ

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकत्र? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now