Ladki Bahin Yojana | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी नुकतीच लाडकी बहीण योजनेची (Ladki Bahin Yojana) घोषणा केली होती. या योजनेची सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. मात्र विरोधक या योजनेवरून जोरदार टीका करताना दिसत आहे. तसेच मुख्यमंत्री लाडका भाऊ योजनेची देखील जोरदार चर्चा आहे. मात्र या दोन्ही योजनांवरून काँग्रेस नेत्यांनी हल्लाबोल केला आहे.
“येणाऱ्या काळात लाडके आजोबा, लाडकी आजी..”
काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी हल्लाबोल करत या योजनांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना राबवल्या जाताना दिसत आहेत. येणाऱ्या काळात लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडकी मुलगी योजना येतील, असं म्हणत विश्वजीत कदम यांनी सरकारला टोला लगावला. (Ladki Bahin Yojana)
विश्वजीत कदम म्हणाले, येत्या काळात सरकारने जनतेची दिशाभूल करू नये अशी अपेक्षा आहे. विश्वजीत कदम यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर टीका केली आहे. या येणाऱ्या योजना आगामी विधानसभा निवडणुकी पुरत्या आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. झोपलेलं सरकार निवडणुकीपूर्वी जागं झालं असून आता या योजना आणत असल्याचं विश्वजीत कदम म्हणाले आहेत. (Ladki Bahin Yojana)
या योजनांचा जर सर्वसामान्य जनतेला लाभ होणार असेल तर नक्कीच आमचा पाठिंबा असेल. या योजनेतून जनतेची दिशाभूल होऊ नये. फसवणूक होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असल्याचं काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.
लाडकी बहीण योजनेत झाला बदल
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी प्रभावी आणि सुलभपणे व्हावी या अटींमध्ये नव्याने सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेत महिलांचं वय हे 18 ते 65 करण्यात आलं. पाच एकरहून अधिक शेतजमीन असणाऱ्या महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचं सांगितलं होतं, मात्र यात बदल करण्यात आला. पाच एकर शेतजमीन असणाऱ्या महिलांना आता या योजनांचा लाभ घेता येणार आहे.
News Title – Vishwajit Kadam On Ladki Bahin Yojana Scheme
महत्त्वाच्या बातम्या
“अंगणवाडी सेविका तुमच्या बहिणी नाहीत का?”; योजनेसाठी काम करण्यास अंगणवाडी सेविकांचा नकार
उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात! 10 ते 12 डब्बे रुळावरून घसरले, मृतांचा आकडा समोर
महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer
कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!
कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला देखील पाऊस झोडपणार






