Virat Kohli | विराट कोहलीच्या संपत्तीचा आकडा समोर; वाचून तुमचेही डोळे होतील पांढरे

On: November 5, 2023 3:00 PM
Virat Kohli
---Advertisement---

मुंबई | टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर किंग कोहली (Virat Kohli Birthday) आज 35 वर्षांचा झाला. कोहली आपल्या जिद्दीच्या जोरावर आपलं ध्येय साध्य करण्यात नेहमीच पुढे राहिला आहे. सुरुवातीपासूनच आव्हानांचा सामना करण्यात पटाईत असलेल्या विराटने (Virat Kohli) आपल्या धाडसी खेळाने भारतीय संघाला नव्या उंचीवर नेलं आहे.

भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) हा जगातील काही प्रसिद्ध खेळाडूंपैकी एक आहे. विराटचे जगभरात अनेक फॅन आहेत. विराट श्रीमंत खेळाडूंपैकी आहे. विराट कोहलीचे इन्स्टाग्रामला 252 मिलियन फॉलोअर्स आहेत. कोहलीची सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे.

विराट कोहलीच्या (Virat Kohli) संपत्तीचा आकडा आता समोर आला आहे. tock Gro च्या रिपोर्टनुसार विराट कोहलीकडे एकूण 1050 कोटींची संपत्ती आहे. सध्याच्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे.

34 वर्षीय विराट कोहली आपल्या A+ संघ करारातून 7 कोटी कमावतो. तसंच प्रत्येक कसोटी सामन्यासाठी 15, एकदिवसीय सामन्यासाठी 6 आणि टी-20 सामन्यासाठी त्याला 3 लाख रुपये मिळतात. याशिवाय आयपीएलमधील आपल्या करारातून त्याला वर्षाला जवळपास 15 कोटी रुपये मिळतात.

दरम्यान, कोहली सध्या क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये व्यस्त आहे, जिथे त्याची कामगिरी उत्कृष्ट आहे. कोहलीने आतापर्यंत सात सामन्यांत 442 धावा केल्या आहेत. आज वर्ल्ड कप 2023मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) आज एकमेकांना भिडत आहेत.

आजचा सामनाच नाहीतर दिवसही खास आहे कारण विराट कोहलीचा वाढदिवस आहे. भारताने टॉस जिंकला असून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतला. बर्थ डे बॉय रोहित आज किती धावा करतो याकडे सर्वाचं लक्ष लागलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘माझ्या डोळ्यांसमोरच…’; अजित पवारांच्या मातोश्रींनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा 

सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ व्यक्तींना मिळणार कुणबी प्रमाणपत्र

सेमी फायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का!

खासदार अमोल कोल्हे कोणत्या गटात?, ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

जरांगेंच्या सभेला जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार ‘इतके’ पैसे, सरकारची मोठी घोषणा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now