BCCI च्या नियमामुळे विराट कोहली नाराज! कारण आलं समोर

On: March 17, 2025 10:54 AM
virat kohli
---Advertisement---

Virat Kohli l भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अलीकडेच कसोटी मालिकेदरम्यान खेळाडूंच्या कुटुंबीयांची उपस्थिती मर्यादित करण्याचा निर्णय घेतला. या नियमाविषयी टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. IPL 2025 सुरू होण्याआधीच त्याने BCCI च्या या निर्णयावर उघडपणे टीका करताना खेळाडूंसाठी कुटुंबाचा सपोर्ट किती महत्त्वाचा असतो हे सांगण्याचा प्रयत्न केला.

विराट कोहलीने व्यक्त केली निराशा :

IPL 2025 पूर्वी RCB संघात सामील झाल्यानंतर विराट कोहलीने ‘इनोव्हेशन लॅब इंडियन स्पोर्ट्स समिट’ मध्ये सहभाग घेतला. यादरम्यान, BCCI च्या नव्या नियमाविषयी बोलताना तो चांगलाच संतापला.

तो म्हणाला, “खेळाडूंच्या कुटुंबीयांचा त्याच्या कामगिरीशी काहीही संबंध नाही. उलट त्यांची उपस्थिती अधिक चांगले प्रदर्शन करण्यास मदत करते. जेव्हा मैदानावर काही कठीण प्रसंग उद्भवतो, तेव्हा घरी परतल्यानंतर कुटुंबीयांशी बोलणं किती महत्त्वाचं असतं, हे लोकांना समजत नाही.”

Virat Kohli l “कोणालाही एकटं बसण्याची इच्छा नसते” – कोहलीचा स्पष्ट संदेश :

कोहलीने पुढे सांगितले, “कुठलाही खेळाडू असो, त्याला त्याच्या जवळच्या व्यक्ती बाजूला हव्या असतात. कोणालाही एकटं बसण्याची इच्छा नसते. वाईट प्रदर्शनानंतर खेळाडू त्यावर मात करण्याचा प्रयत्न करत असतो. क्रिकेट हा जबाबदारीने खेळला जाणारा खेळ आहे, पण त्याचवेळी प्रत्येक खेळाडूला एक सामान्य आयुष्य जगण्याची इच्छा असते.”

BCCI ने हा कठोर नियम का लागू केला? :

गेल्या वर्षी भारताला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागला. तसेच, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्येही भारतीय संघाचे प्रदर्शन अपेक्षेपेक्षा खूपच खराब झाले.

संघाच्या सलग अपयशामुळे BCCI ने कसोटी दौऱ्यांमध्ये खेळाडूंच्या कुटुंबीयांची उपस्थिती मर्यादित करण्याचा निर्णय घेतला. नवीन नियमानुसार, खेळाडूंचे साथीदार आणि मुले फक्त दोन आठवड्यांसाठीच संघासोबत राहू शकतात. BCCI च्या मते, खेळाडूंनी मैदानावर लक्ष केंद्रीत करावे, यासाठी हा नियम लागू करण्यात आला आहे.

News Title: Virat Kohli Criticizes BCCI Rule on Limiting Family Presence During Series

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now