RCB Captaincy | इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 सुरू होण्यास काहीच दिवस शिल्लक आहेत. 22 मार्चपासून या हंगामाची सुरुवात होणार आहे. यादरम्यान, RCB अनबॉक्स इव्हेंटमध्ये विराट कोहलीने नव्या कर्णधार रजत पाटीदारला पूर्ण पाठिंबा दिला आणि त्याच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले. (RCB Captaincy)
RCB कर्णधारपदावर विराट कोहलीचा विश्वास
विराट कोहली 2008 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (RCB) खेळत आहे. अनेक वर्षे त्याने संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र, या हंगामात फाफ डु प्लेसिसच्या जागी रजत पाटीदारला कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे.
फाफ आता दिल्ली कॅपिटल्सचा उपकर्णधार आहे. RCB अनबॉक्स इव्हेंटमध्ये विराट कोहली म्हणाला, “रजत संघाचे दीर्घकाळ नेतृत्व करेल. त्याच्याकडे यशस्वी होण्यासाठी आवश्यक सर्व गुण आहेत.”
RCB अद्याप आयपीएल विजेतेपदापासून दूर
RCB आजपर्यंत एकदाही IPL विजेतेपद जिंकू शकलेले नाही. विराट कोहली म्हणाला, “पुन्हा एकदा संघासोबत राहून खूप आनंद होत आहे. संघात मोठी प्रतिभा आहे. मी या हंगामासाठी प्रचंड उत्सुक आहे.” हा आयपीएल हंगाम विराटसाठी खास असेल, कारण तो T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरचा त्याचा पहिला IPL असणार आहे. (RCB Captaincy)
We’ll all rally behind you in this new chapter of yours as Captain of RCB, Rajat! ????
You got this! ???? pic.twitter.com/G8J8vLsxlg
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) March 17, 2025
रजत पाटीदारच्या भावना
RCB कर्णधारपदी नियुक्त झाल्याने रजत पाटीदार खूप आनंदी आहे. त्याने अनबॉक्स इव्हेंटमध्ये भावना व्यक्त करताना सांगितले, “विराट भाऊ, एबी डिविलियर्स आणि ख्रिस गेल यासारखे दिग्गज RCBसाठी खेळले आहेत. मी त्यांना पाहत मोठा झालो. ही फ्रेंचायझी मला नेहमीच आवडली आहे. आज याच संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.”
Title : Virat Kohli Big Statement on RCB Captaincy






