“अजित पवार माझे मित्र, हे सरकार पुन्हा यावं, मी मंत्री व्हावं”; पांडुरंगाला कुणी घातलं साकडं?

Vijay Shivtare | राज्यभरात सध्या आषाढी वारीमुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून पंढरीच्या दिशेने टाळ-मृदुंगाचा गजर करत, मुखी हरीनाम जपत दिंड्या पंढरीकडे रवाना झाल्या आहेत. देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील एका मोठ्या नेत्याने पांडुरंगाला साकडं घातलं आहे.

माजी मंत्री विजय शिवतारे यांनी मी मंत्री व्हावे, असं पांडुरंगाला साकडं घातलं आहे. आज ते सासवड येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार हे आपले मित्र असून त्यांच्याबद्दल मिठाचा खडा पडेल, असं कुठलंही वक्तव्य मी करणार नाही, असं शिवतारे म्हणाले.

“मी मंत्री व्हावं हेच पांडुरंगाला मागणे”

लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी अजित पवार यांना विरोध करणारे विजय शिवतारे यांनी यावेळी अजित दादांचा ‘मित्र’ म्हणून उल्लेख केलाय. यावेळी, बोलताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आपण आमदार आणि मंत्री व्हावे, हीच मागणी पांडुरंगाकडे केल्याचं शिवतारे म्हणाले.

तसंच पालखी सोहळा सासवड नगरीत येणे म्हणजे आमच्यासाठी भाग्याचा क्षण आहे. पालखी सासवडमध्ये उशिरा येण्यामागे प्रशासन काही प्रमाणात जबाबदार आहे, ही काळी नजर कुणाची आहे हे आमदारांना विचारावे लागेल, असंही यावेळी शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले.

विजय शिवतारे यांचं मोठं वक्तव्य

अजित पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, “मी महायुतीत मिठाचा खडा पडेल असे काही वक्तव्य करणार नाही, साखर पडेल असेच मी बोलेल. अजित पवार माझे मित्र आहेत, हे सरकार परत यावे, मी आमदार व्हावे आणि मंत्री व्हावे अशी मागणी आपण पांडुरंगाकडे केलीये.”, असं विजय शिवतारे म्हणाले आहेत.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांविरुद्ध पुकारलेल्या बंडामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र, काही दिवसांतच त्यांनी आपले बंड शमवले होते. अशात त्यांनी अजित पवारांबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय.

News Title – Vijay Shivtare big statement 

महत्त्वाच्या बातम्या-

राज्य सरकारचा मोठा निर्णय! आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना आजपासून टोलमाफी

‘जोधा अकबर’ फेम परिधी शर्माचं हटके ट्रांसफॉर्मेशन; फोटो पाहून म्हणाल..

“लाडकी बहीण योजनेची भीक नको, 1500 रूपयांमध्ये संसार होणार आहे का?”

फळभाज्यांचे दर कडाडले; भाव गेले थेट शंभरी पार

दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; पोस्ट ऑफिसकडून बंपर भरती