Vijay-Rashmika Wedding | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या लग्नाची चर्चा आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूर येथे हा विवाहसोहळा पार पडणार आहे. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत खासगी स्वरूपात होणार असून ठिकाण आणि पाहुण्यांबाबत विशेष गोपनीयता राखली जात आहे. (Rashmika Mandanna marriage)
अरावलीत आलिशान रिसॉर्टची निवड :
लग्नासाठी उदयपूरपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर अरावली पर्वतरांगांमध्ये वसलेल्या भव्य आणि खाजगी रिसॉर्टची निवड करण्यात आली आहे. या इस्टेटमध्ये तब्बल 117 स्वतंत्र व्हिला, तलाव आणि नदी परिसरासह स्वतंत्र हेलिपॅडची सुविधा उपलब्ध आहे. बाहेरील लोकांच्या नजरेपासून पूर्णपणे दूर राहील, अशी ही जागा असल्यामुळेच आयोजकांनी या ठिकाणाची निवड केल्याचे सांगितले जाते.
सोहळा तीन दिवस चालणार असून उपस्थित पाहुण्यांची संख्या केवळ 100 पर्यंत मर्यादित ठेवण्यात आली आहे. त्यापैकी सुमारे 50 जण कुटुंबीय आणि अतिशय जवळचे मित्र असतील. सर्व पाहुणे व्यावसायिक विमानाने उदयपूरला पोहोचणार आहेत. मोठ्या प्रमाणावर बॉलिवूड किंवा दक्षिण चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. मात्र काही निवडक दिग्दर्शक आणि राजकीय मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Vijay-Rashmika Wedding | ‘VIROSH’ थीम आणि कडेकोट सुरक्षा :
चाहत्यांनी विजय आणि रश्मिकाच्या नावांचा मिलाफ करून ‘VIROSH’ हे नाव प्रचलित केले आहे. त्याच नावावरून या लग्नसोहळ्याला “The Wedding of VIROSH” असे शीर्षक देण्यात आले आहे. दोघांनीही सोशल मीडियावर चाहत्यांचे आभार मानले आहेत. अलीकडेच दोघे उदयपूरकडे रवाना होताना विमानतळावर दिसले होते. (Rashmika Mandanna marriage)
लग्न पूर्णपणे गोपनीय राहावे यासाठी आंतरराष्ट्रीय सुरक्षा संस्थेची मदत घेण्यात आली आहे. राजस्थान पोलिसांच्या समन्वयाने संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था असेल. कार्यक्रमस्थळी मोबाइल फोन आणि कॅमेऱ्यांवर सक्त बंदी घालण्यात येणार आहे, जेणेकरून कोणतीही माहिती किंवा छायाचित्रे बाहेर जाऊ नयेत. त्यामुळे हा विवाहसोहळा अत्यंत खासगी आणि मर्यादित उपस्थितीत पार पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.






