‘…म्हणून ससून रूग्णालयात जास्त मृत्यू होतात’, धक्कादायक माहिती समोर

On: October 6, 2023 11:44 AM
---Advertisement---

पुणे | ससून सर्वोपचार रुग्णालयात केवळ पुण्यातूनच नव्हे तर राज्यातील इतर भागातून रुग्ण गंभीर आजारांवरील उपचारासाठी येतात. तसेच रुग्णालयात किरकोळ आजारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात रूग्णांच्या मृत्यूची संख्या देखील वाढताना दिसत आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

ससून रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात दिवसाला एक हजार 80 रुग्ण दाखल होत असून, दाखल रुग्णांपैकी दर दिवशी सरासरी 18 रुग्णांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे. 

अनेकदा खासगी रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण अत्यवस्थ झाला, की त्याला ससून रुग्णालयात दाखल केलं जातं. त्यामुळे मृत्यू ‘ससून’मध्ये झाला, अशी नोंद केली जाते, असं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे.

रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत असल्याने सर्वच विभागांत उपचार घेण्यासाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. रुग्णालयात पुणे शहर, जिल्ह्यासह सांगली, सातारा, सोलापूर, नगर आणि राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण जास्त आहे, अशी माहिती रूग्णालयाने दिलीये.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now