दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!

On: December 27, 2024 8:11 PM
Pune News
---Advertisement---

पुणे: निसर्ग, दुर्गप्रेमी आणि ट्रेकर्ससह पर्यटकांचा आनंद द्विगुणित करणाऱ्या वासोटा किल्ल्यावरील पर्यटनास ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे, अशी माहिती सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोली वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय बाठे यांनी दिली. पुण्यातून या ठिकाणी पर्यटनाला जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते.

सुरक्षेच्या कारणास्तव घेतला निर्णय

कोयना खोऱ्यात वसलेला वासोटा किल्ला सरत्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

पर्यटकांची असते कायमच भुरळ

पुणे जिल्ह्याच्या अगदी जवळ असलेल्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात कोयना अभयारण्य व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या निसर्ग संपन्न गाभा क्षेत्रात वासोटा किल्ला वसला आहे. या किल्ल्याची ट्रेकर्स, दुर्ग आणि निसर्गप्रेमींसह पर्यटकांना कायमच भुरळ पडते. सुट्टीच्या दिवशी या किल्ल्यावर पर्यटकांची मांदियाळी दिसून येते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडत असतात.

वनविभागाचा गाभा क्षेत्रात येत असल्याने निर्णय

त्या पार्श्वभूमीवर वासोटा किल्ला वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या परिसरात पर्यटकांची गर्दी वाढून निसर्ग संपदेला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे, असे बाठे यांनी सांगितले.

बोटिंग संस्थांना सूचना

तशा सूचना कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग संस्थांना देण्यात आल्या आहेत. या काळात वासोटा किल्ला तसेच अभयारण्य परिसरात कोणीही बेकायदेशीररित्या आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वनपरिक्षेत्र अधिकारी बाठे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा

क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दंड

मुंबईकरांनो सावधान… प्रत्येक श्वासागणिक तुमच्या शरीरात चाललंय विष!, सगळी माहिती नीट वाचा

PMPML बसने प्रवास करणाऱ्या ‘त्या’ प्रवाशांसाठी खूशखबर, आता ही खास सुविधा मिळणार!

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now