वसंत मोरेंनी उद्धव ठाकरेंची भेट घेताच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले!

Vasant More |  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर वसंत मोरे (Vasant More) यांनी मनसेला राम राम करत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीतून वसंत मोरे (Vasant More) यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र म्हणावी अशी मते वसंत मोरे यांना पडली नाही. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. त्यानंतर आता पुन्हा एकदा वसंत मोरे (Vasant More) यांनी आपली वेगळी वाट धरली आहे. त्यामुळे आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत.

वसंत मोरेंचा निर्णय पचनी पडला नाही

वसंत मोरे (Vasant More) यांनी गुरूवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते उद्धव ठाकरे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. वसंत मोरे यांनी घेतलेला हा निर्णय़ अनेकांच्या पचनी पडलेला नाही.

अशातच आता पुणे शहरातील कात्रज येथील कार्यकर्ते जनसंपर्क कार्यालयाबाहेर आंदोलन करणार आहेत. वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे गटाची वाट धरल्याने वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संतापले आहेत. वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांचा विश्वासघात केला असल्याचा आरोप केला आहे.

अशातच वंचित बहुजन आघाडीचे काही कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडी युवा महिला, महिला आघाडी, माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचं वंचितच्या कार्यकर्त्यांनी आवाहन केलं आहे.

वसंत मोरे ‘या’ मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे हे त्यांच्या हडपसर आणि खडकवासला दोन्हींकडून लढू शकतात. पुणे शहरात माझं मतदान नव्हतं. माझा तो भाग नव्हता तरीही मला चांगली मते मिळाली आहे. माझ्यावर पहिला गुन्हा हा शिवसेनेत असताना झाला होता, असं वसंत मोरे म्हणाले होते.

मी बदलणार नाही. जनतेसाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करणार असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत. शिवसेनेची शहरात आणि बाहेर देखील चांगली ताकद असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत. तसेच 10 नगरसेवक आहेत त्यांची बाहेर देखील ताकद असल्याचं वसंत मोरे म्हणाले आहेत.

News Title – Vasant More Will Join Shivsena Thackeray Group News Update

महत्त्वाच्या बातम्या

अभिषेकसोबत लग्नबंधनात अडकण्यापूर्वी ऐश्वर्याने आधीही केलं होतं लग्न?

बॉलिवुडच्या ज्येष्ठ अभिनेत्रीने घेतला अखेरचा श्वास; राज कपूर-देवानंद यांच्यासोबत केलंय काम

एसबीआय बँकेत काम करण्याची सुवर्ण संधी; लगेचच करा अर्ज

“गौतम अदानींना जमीन देण्यास विरोध केल्यानेच…”; विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

दहावी पास तरुणांना थेट सरकारी नोकरीची संधी; वेळ वाया घालू नका, ‘इथे’ करा अर्ज