अभिनेता वरुण धवनने चाहत्यांना दिली मोठी गुड न्यूज!

On: February 19, 2024 11:09 AM
Varun Dhawan and Natasha Dalal are going to be parents
---Advertisement---

Varun Dhawan | अभिनेता वरुण धवनने चाहत्यांना एक मोठी गुड न्यूज दिली आहे. त्याने सोशल मिडियावर एक पोस्ट करत ही खुशखबर दिली आहे. वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल लवकरच आई-बाबा होणार आहेत. वरुणने (Varun Dhawan ) एक पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे.

वरुणने नताशासोबतचा एक फोटो पोस्ट करत स्वतःच याची माहिती दिली आहे. या बातमीमुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. चाहते दोघांनाही भरभरून शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेक सेलेब्रिटीनीही कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

वरुण धवनची पोस्ट चर्चेत

वरुण धवन (Varun Dhawan ) याने इंस्टाग्रामवर ही पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘आम्ही प्रेग्नेंट आहोत…तुमच्या आशिर्वादाची गरज आहे.’#फॅमिली हीच माझी ताकद आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. वरुण धवन आणि नताशा यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

यासोबतच वरुणने एक मोनोक्रॉम फोटो पोस्ट केला आहे. फोटोमध्ये वरुण धवन पत्नी नताशाच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. या फोटोला चाहते प्रचंड पसंत करत आहेत. यावर करीना कपूरने प्रतिक्रिया देत म्हटलं की, ही जगातली बेस्ट फिलिंग आहे. तर, आलिया भट्टनेही हार्ट्स वाली कमेंट केली आहे. तर, अभिनेता अर्जुन कपूरने त्यांना ‘बेस्ट मॉमी आणि डॅडी नं 1’ असे लिहिले आहे.

वरुण धवन आणि नताशा दलाल आई-बाबा होणार

वरुण धवन (Varun Dhawan )आणि नताशा दलाल यांचं 24 जानेवारी 2021 मध्ये लग्न झालं. दोघेही बालपणीचे मित्र आहेत. सहावी क्लासपासून ते सोबत आहेत. त्यांना एका कॉन्सर्ट दरम्यान एकमेकांवर प्रेम झाले. त्यामुळे त्यांनी बरीच वर्ष एकमेकांना डेट केले.

आता लग्नाच्या तीन वर्षांनी नताशाने ही गुड न्यूज दिली आहे. बॉलीवुडमधीलच अजून एक जोडपंही लवकरच आई-बाबा होणार आहे. अभिनेत्री यामी गौतम देखील गरोदर असल्याच्या चर्चा आहेत. तसेच, अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

News Title- Varun Dhawan and Natasha Dalal are going to be parents

महत्त्वाच्या बातम्या –

शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद; मोठा पोलीस बंदोबस्त, गावाचे छावणीत रूपांतर

…म्हणून शोएब सानियापासून वेगळा झाला; पतीला चीअर करताना सना, चाहत्यांनी घेतली फिरकी

सावधान! ‘या’ अशा महिलांपासून ‘दूरी है जरूरी’, कारण चाणक्य म्हणतात…

अखेर विराट कोहलीच्या अनुपस्थितीचं कारण आलं समोर; ‘विरुष्का’बद्दल मोठी अपडेट

दीपिका पादुकोणने पुन्हा वाढवली भारताची शान; लंडनमधील प्रतिष्ठित पुरस्कार सोहळा गाजवला

Join WhatsApp Group

Join Now