“पप्पा… आम्हाला माफ करा”, देशमुखांच्या लेकीने हंबरडा फोडला

On: January 10, 2025 4:55 PM
Vaibhavi Deshmukh
---Advertisement---

Vaibhavi Deshmukh l बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे राज्यभर पडसाद उमटत आहेत. या हत्ये प्रकरणी केज पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे या हत्येमागे मुख्य संशयित आरोपी आहेत. अशातच या हत्येचा निषेध करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मोर्चे निघत आहेत. आज जालना येथे मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखने हंबरडा फोडला आहे.

“तुम्ही आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा” :

जनआक्रोश मोर्चामध्ये वैभवी देशमुख म्हणाली की, “आज आमचा आनंद आमच्यापासून हिरावून घेतला आहे. तसेच तुमच्या पाठिंब्यामुळेच आज आम्ही उभे राहू शकलो, तसेच तुमच्यामुळेच आम्ही न्यायाचा लढा देखील पुढे नेऊ शकलो. त्यामुळे आता आपल्याला न्याय मिळवायचा आहे, तसेच त्यासाठी तुम्ही मानवतेच्या नात्याने एकत्र येऊन आमच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे उभे राहिलात तसेच आमच्या पाठीमागे सदैव उभे राहा”, असं ती म्हणाली आहे.

याशिवाय “तुम्ही सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. तसेच आम्ही ज्या वेळेस रस्त्याने चालत होतो त्यावेळेस आम्हाला कोणालाही धक्काबुक्की होऊ नये म्हणून तुम्ही लोकांना हात जोडून विनंती केली आहे की, आम्हाला चालू द्या. मात्र त्यासाठी मी तुमचे आभार मानते” असं वैभवी म्हणाली आहे.

Vaibhavi Deshmukh l “पप्पा… आम्हाला माफ करा” :

दरम्यान, आज आम्ही रस्त्याने नीट चालू देखील शकत नाही तरी देखील तुम्ही आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतात. पण माझा या घटनेतील आरोपींना एक प्रश्न आहे की, तुम्ही माझ्या वडिलांना इतका छळ करून का मारले? तसेच त्यावेळी त्यांना किती वेदना झाल्या असतील,, या प्रश्नाचे उत्तर मला हवे असल्याचं तीन म्हंटल आहे.

वैभवी पुढे म्हणाली की, “मी स्वतःला प्रचंड भाग्यशाली समजते की, मी देशमुख कुटुंबियातील मुलगी आहे. तसेच माझ्या आई वडिलांची मी लेक आहे. मात्र पप्पा… तुम्ही आज जिथे कुठे असाल तिथे हसत रहा, आणि आम्हाला माफ करा की आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही, असे म्हणत वैभवीला अश्रू अनावर झाले.

News Title : vaibhavi deshmukh emotional at jan aakrosh morcha

महत्वाच्या बातम्या –

मुन्नी मला घाबरत आहे?, सुरेश धस यांचा हल्लाबोल

‘अण्णा माझे दैवत…’ म्हणणारा बीडचा गोट्या गीते कोण?

“…तर सरपंच देशमुखांचे प्राण वाचले असते”; खळबळजनक खुलासा समोर

तुम्हालाही कुंभमेळ्याला जायचंय?; पुण्यातून धावणार विशेष ट्रेन, पाहा तिकीट दर

आरोपींना पोलीसच वाचवताय?, ‘त्या’ हत्याप्रकरणी पोलिसांवर गंभीर आरोप

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now