Uttarakhand Landslide Video | मुसळधार पावसाने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. राज्यात मुंबईमध्ये पावसाने प्रचंड नुकसान केलंय. रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील पावसाचा तडाखा बसला. यामुळे शेतीचं देखील बरंच नुकसान झालंय. सध्या राज्यासह देशातील अनेक भागात जोरदार पाऊस बरसत आहे. नुकतीच उत्तराखंड येथून एक मोठी माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडमधून भूस्खलनाचा एक भयानक व्हिडीओ समोर (Uttarakhand Landslide Video) आला आहे. हा व्हिडिओ बघून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. उत्तराखंडमधील चमोली येथे मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे.
पातालगंगा लंगसी बोगद्याजवळ भूस्खलन
पातालगंगा लंगसी बोगद्याजवळ ही भयानक भूस्खलनाची (Uttarakhand Landslide Video) घटना घडली आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चमोली जिल्ह्यातील पातालगंगा येथे भूस्खलन झालं आहे. अवघ्या काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये डोंगराचा मोठा भाग तुटून महामार्गावर पडताना दिसतोय.
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, डोंगराचा एक मोठा भाग कोसळून महामार्गावर पडतो, दोन्ही बाजूला लोक दिसत आहेत.डोंगराचा मोठा भाग तुटून रस्त्यावर पडताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आता तूफान व्हायरल झाला आहे.
Massive landslide is being reported at Chungi Dhar in Joshimath which has blocked the Badrinath National Highway of Uttarakhand. pic.twitter.com/EL7aUvH8E2
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) July 10, 2024
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पाहायला गेलं तर, तीन दिवसांपासून या (Uttarakhand Landslide Video) भागात पाऊस पडला नाही. तरीही डोंगर कोसळण्याच्या घटना घडत आहेत. येथील पागल नाला या ठिकाणी देखील भूस्खलन झाले आहे. तसेच जोशीमठमध्ये महामार्गाला तडे गेल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी तेथे अडकून पडले आहेत.
News Title – Uttarakhand Landslide Video
महत्त्वाच्या बातम्या-
“..तरी मराठी इंडस्ट्री मूग गिळून गप्प का?”; वरळी हिट अँड रन प्रकरणी संजय राऊतांचा सवाल
‘तुमचा वेळ घ्या’ म्हणत हाॅट अंदाजात अभिनेत्रीचे फोटो होतायत व्हायरल!
अंबानींच्या कार्यक्रमात खाण्याच्या पदार्थात आढळलं असं काही, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
“जरांगेंनी 288 जागांवर निवडणूक लढवावीच, त्यांना एकदाचं कळूनच जाईल”
आता मद्यधुंद होत गाडी चालवल्यास थेट लायसन्स होणार रद्द; ‘या’ शहरात घेण्यात आला मोठा निर्णय






