Urmila Kothare | मुंबईतील कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ एक भीषण अपघात घडला आहे, ज्यामध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडले आहे. या अपघातात एक मजुराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा मजुर गंभीर जखमी झाला आहे.
नेमकं काय घडलं?
उर्मिला कोठारे (Urmila Kothare) शूटिंग संपवून घरी परतत होती तेव्हा हा अपघात झाला. त्यावेळी तिची कार वेगात होती आणि ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार रस्त्याच्या कडेला काम करत असणाऱ्या मजुरांना धडकून गेली. ही घटना मुंबईच्या कांदिवली पश्चिमच्या पोईसर मेट्रो परिसरात घडली आहे.
व्हिडीओ व्हायरल-
अपघाताच्या वेळी उर्मिला कोठारे (Urmila Kothare) आणि ड्रायव्हर देखील दुखापत झाले आहेत. कारचा वेग जास्त असल्याने हा अपघात झाला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे. घटनास्थळावरील व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत, ज्यात कारचा भाग समोरून चक्काचूर झाला आहे.
मुंबई: अभिनेत्री उर्मिला कानेटकर की कार का बुरी तरह एक्सीडेंट हो गया। कार ड्राइवर ने नियंत्रण खोते हुए दो मज़दूरों को उड़ा दिया जिनमें से एक की मौत होने की खबर है तो दूसरा गंभीर रूप से घायल है। हादसे में कार ड्राइवर और एक्ट्रेस को भी चोटें आई हैं। पुलिस के मुताबिक सही समय पर… pic.twitter.com/i11ZSmeXjj
— IANS Hindi (@IANSKhabar) December 28, 2024
या अपघातात एक मजुराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा मजुर गंभीर जखमी झाला आहे. जखमी मजुराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेने स्थानिक नागरिक आणि अभिनेत्री उर्मिला कोठारे यांच्या चाहत्यांमध्ये खेदाची भावना निर्माण झाली आहे.
ज्या मजूरांना उर्मिलाच्या कारने उडवलं ते दोन्ही मजूर हे मेट्रोमध्ये काम करणारे होते, अशी माहिती समोर आलेली आहे. उर्मिलाही या अपघातात जखमी झालीये. पण एका मजूराचा यामध्ये मृत्यू झालाय. त्यामुळे सध्या पोलिसांचा तपास त्या दिशेने सुरु असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबईतील समतानगर पोलिसांनी कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
News Title : urmila kothare car accident
महत्त्वाच्या बातम्या-
प्राजक्ता माळीचं नाव घेतल्याने मनसे नेता आक्रमक, सुरेश धसांना झापलं
दुर्गप्रेमींनो ‘या’ किल्ल्यावर फिरायला जाणार असाल तर आत्ताच थांबा, 3 दिवस राहणार बंद!
पुण्याजवळच्या खेड, शिरूरमध्ये मानवी वस्तीत बिबट्याचा संचार, पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ
राज्यात पुढील २ दिवस पावसासह गारपिटीचा इशारा; ऑरेंज अलर्ट… पाहा कुठे कुठे आहे इशारा
क्रेडिट कार्ड वापरणारांसाठी महत्त्वाची माहिती, आत्ताच वाचा नाहीतर भरावा लागेल मोठा दं






