जुलै महिन्यात लाँच होणार ‘या’ भन्नाट कार; पाहा यादी

Upcoming Cars l कारप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. या महिन्यात सहा नवीन कार लॉन्च होणार आहेत, यामध्ये नवीन EVs ते नवीन SUV चा समावेश आहे. यासोबतच एक लक्झरी सेडान देखील लॉन्च होणार आहेत. तर आज आपण या महिन्यात कोणत्या कार भारतीय बाजारपेठेत दाखल होणार आहेत ते जाणून घेऊयात…

या महिन्यात लाँच होणार कार :

Mercedes-Benz EQA :

Mercedes-Benz EQA ही कार मर्सिडीज-बेंझची सर्वात लहान इलेक्ट्रिक कार असणार आहे. ही कार भारतात FWD अवतारात येणार आहे. ही कार लांब पल्ल्याच्या बॅटरीसह येणार आहे. कंपनीचा दावा आहे की, ही कार एका चार्जिंगमध्ये 560 किलोमीटर अंतर कापेल. मर्सिडीज-बेंझ या कारची EQA ही EQB पेक्षा छोटी कार असणार आहे. ही कार GLA कॉम्पॅक्ट लक्झरी SUV ची इलेक्ट्रिक व्हर्जन असणार आहे. ही कार 8 जुलै रोजी भारतीय बाजारात लाँच होणार आहे.

BYD Atto 3 :

BYD Atto 3 लवकरच बाजारात लहान बॅटरी पॅक आणि कमी पॉवरसह लॉन्च केले जाईल. पण या मॉडेलची सर्वातखास गोष्ट म्हणजे ही कार लोअर एंट्री पॉईंटसह येणार आहे, ज्यामुळे भारतात या कारची विक्री वाढू शकते. या इलेक्ट्रिक एसयूव्हीला तिचे फीचर्स कमी करून परवडणारी बनवण्यात आली आहे.

Upcoming Cars l जबरदस्त फीचर्ससह लाँच होणार या कार :

Nissan X-Trail :

Nissan ची नवीन जनरेशन X-Trail लवकरच भारतात बाजारात येणार आहे. ही पूर्णपणे परदेशी बनावटीची कार (CBU) असून या कारचे मॉडेल्स भारतात येणार आहेत. एक्स-ट्रेल भारतात टर्बो-पेट्रोल इंजिनसह येऊ शकते. तसेच, 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही व्हर्जन उपलब्ध असू शकतात.

BMW 5-Series LWB :

BMW ची नवीन 5-सीरीज 24 जुलै रोजी लॉन्च होणार आहे. यावेळी LWB व्हेरियंटसह 5-सीरीज बाजारात येईल. या कारमध्ये डिझेल आणि पेट्रोल दोन्ही व्हेरिएंट पाहायला मिळतात. पण या कारमध्ये लक्झरी फीचर्सवर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे, ज्यामध्ये या मॉडेलमध्ये या कारची मागील सीट महत्त्वाची ठरू शकते.

News Title : Upcoming Cars in July 2024

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! हवामान विभागाकडून ‘या’ जिल्ह्यांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

पुण्यात आढळले झिकाचे 7 रुग्ण; काय आहेत लक्षणं

चांदी सूसाट तर सोन्याने टाकला दरवाढीचा गिअर, काय आहेत आजच्या किंमती?

तुमचं इंस्टाग्राम हॅक झालं आहे का? हे तपासण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

माझी लाडकी बहीण योजनेसाठी कोण पात्र? कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता? जाणून घ्या एका क्लिकवर