मोदी सरकारच्या बजेटमधील 10 महत्वाच्या घोषणा!

On: July 23, 2024 2:36 PM
Union Budget 2024 10 Important Announcements
---Advertisement---

Union Budget 2024 | नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन केल्यानंतर आज 23 जुलैरोजी मोदी सरकारचा तिसरा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात(Union Budget 2024 ) शेती क्षेत्रातील उत्पादकता, रोजगार व कौशल्य विकास, मनुष्यबळ विकास व सामाजिक न्याय, उत्पादन व सेवा, शहरी विकास, उर्जा संरक्षण, पायाभूत संरचना, संशोधन व विकास, नव्या पीढीतील सुधारणा या 9 घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. शिक्षण, कृषी आणि रोजगार निर्मिती यासारख्या क्षेत्रांवर त्यांनी अर्थसंकल्पात विशेष भर दिला आहे. अर्थसंकल्पामध्ये मोदी सरकारने बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी विशेष घोषणा केली आहे.

आंध्र प्रदेशसाठी 15 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. तर, बिहारसाठी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात (Union Budget 2024 ) आली आहे. यासाठी अर्थमंत्र्यांनी दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांना हे मोठं गिफ्टच मिळालं आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पातील 10 ठळक मुद्दे

  • देशात रोजगार आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. 2 लाख कोटी रुपयांच्या तरतुदीसह तरुणांसाठी 5 योजनांची घोषणा करण्यात आली आहे. याचा 5 कोटींहून अधिक तरुणांना फायदा होणार आहे. रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी 3 योजनांची घोषणा करण्यात आली आहे.
  • कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा फायदा(Union Budget 2024 ) शेतकरी आणि त्यांच्या जमिनींना होईल.
  • अर्थसंकल्पामध्ये बिहारला 3 एक्सप्रेसवे मिळाले. 26 हजार कोटी रुपये खर्चून हे नवीन रस्ते बांधण्यात येणार आहेत. गयामध्ये इंडस्ट्रियल हब बनवण्यात येणार आहे.
  • देशात पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांना EPFO ​​मध्ये त्यांच्या योगदानानुसार प्रोत्साहन मिळेल. 30 लाख तरुणांना याचा फायदा होणार आहे. यामध्ये पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना 15 हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे.
  • प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी, कंपन्यांना (Union Budget 2024 ) 2 वर्षांसाठी दरमहा 3-3 हजार रुपये प्रतिपूर्ती मिळेल. याचा फायदा 50 लाख जणांना होणार आहे.
  • फॉर्मल सेक्टरमध्ये काम करणाऱ्यांना थेट लाभ हस्तांतरण अंतर्गत 15,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार. एक लाख रुपयांपर्यंत पगार असलेले कर्मचारी यासाठी पात्र असतील.
  • मुद्रा कर्ज मर्यादा वाढली आहे. आता या योजनेंतर्गत 10 ऐवजी 20 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.
  • ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • शेतकऱ्यांसाठी डिजिटल प्लॅटफॉर्म उभारणार, सहा कोटी शेतकऱ्यांचा रेकॉर्ड डिजिटल होणार. शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी(Union Budget 2024 ) डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर पुरवलं जाईल.या वर्षी शेती व संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
  • अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 12 औद्योगिक उद्यानांची घोषणा केली आहे.

News Title- Union Budget 2024 10 Important Announcements

महत्वाच्या बातम्या-

घराचं स्वप्न होणार साकार! मोदी सरकारची अफोर्डेबल हाउसिंग स्कीमवर मोठी घोषणा

कॅन्सरच्या रुग्णांना मोठा दिलासा! अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांची बजेटमध्ये मोठी घोषणा

मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय स्वस्त, काय महाग?; वाचा सविस्तर

मोदी सरकारचं चंद्राबाबू आणि नितीशकुमार यांना मोठं गिफ्ट; दोन्ही राज्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा

तरुणांसाठी खुशखबर! पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांना मिळणार 15000 रुपयांचा भत्ता, पैसे येणार थेट खात्यात

Join WhatsApp Group

Join Now