Uddhav Thackeray | लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला उत्तर प्रदेशमध्ये मोठा धक्का बसला. अयोध्येमध्ये भाजपने भव्य राम मंदिर बांधले. निवडणुकीत राम मंदिराचा मुद्दा देखील बराच गाजला. मात्र, याच अयोध्येत भाजपला जनतेने नाकारले. येथे भाजप उमेदवाराचा दारुण पराभव झाला.
याच पार्श्वभूमीवर आज (15 जून) उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधत जोरदार टीका केली. आज महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह शरद पवार आणि मविआचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पराभवावर मोठं भाष्य केलं.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“भाजपाचा अजिंक्यपणा किती फोल, हे जनतेनं दाखवून दिलं. लोकसभा निवडणूक ही अंतिम नाही तर ही लढाई आता सुरू झाली आहे. विधानसभेची निवडणूक महाविकास आघाडी अधिक ताकदीने लढणार आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, “मी नाशिकमध्ये 22 जानेवारी रोजी सभा घेतली होती. त्या दिवशी मी काळाराम मंदिरात भगवान रामाचे दर्शन घेतले. त्या ठिकाणी मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपमुक्त राम हवाय. मग हा भाजपमुक्त राम अयोध्यावासियांनी करुन दाखवला. त्या ठिकाणी भाजपला यश मिळाले नाही.”, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली आहे.
“नरेंद्र मोदी कसेबसे पंतप्रधान झाले आहेत”
पुढे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. “मोदी कसेबसे पंतप्रधान झाले आहेत. हे सरकार किती दिवस राहील काही सांगता येत नाही. यांच्यात खरेपणा नाही. यांचा फोलपणा समोर आला आहे. देशातील जनता जागी झाली. मोदींवर लोकांचा विश्वास होता. तो उडाला आहे. पुढच्या निवडणुकीमध्ये देशाचं चित्र चांगलं राहील.”, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
यावेळी उद्धव ठाकरे यांना जे लोक सोडून गेले त्यांना परत घेणार का?, असा सवाल करण्यात आला. त्यावर उद्धव ठाकरे यांनी ‘अजिबात नाही’ असं उत्तर दिलं. आज मुंबईत झालेल्या या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बऱ्याच मुद्यांवर भाष्य केलं.
News Title- Uddhav Thackeray Target BJP
महत्त्वाच्या बातम्या –
SBI ग्राहकांना सर्वात मोठा झटका; बँकेने घेतला मोठा निर्णय
अखेर मलायकाने प्रेग्नंसीबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली ‘या महिन्यात बाळाला….’
उपोषण स्थगित केल्यानंतर अंतरवाली सराटीतून मोठी बातमी समोर!
आलिया भट्टचा पुन्हा नको तसला व्हिडिओ व्हायरल; चाहते म्हणाले, “…हे भयानक”
“मला मित्रासोबत झोपवलं आणि…”, करिश्मा कपूरच्या वक्तव्याने बॉलिवूड हादरलं






