“उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही”

On: February 22, 2023 11:18 AM
---Advertisement---

मुंबई | जोपर्यंत महाराष्ट्रातील राजकीय संकट संपत नाही तसेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान होत नाही तोपर्यंत त्या पायामध्ये चप्पल घालणार नाही, अशी प्रतिज्ञा कल्याणमधील एका महिला कार्यकर्त्या आशा रसाळ (Aasha Rasal) यांनी घेतली आहे.

मंगळवारी कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावर असलेल्या दुर्गा माता मंदिरामध्ये देवीच्या चरणी आशा रसाळ यांनी साकडं घातलं. यावेळी त्या बोलत होत्या.

आज महाराष्ट्रावर संकट आलंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेवर संकट आहे. शिवसैनिक म्हणून, छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून आज मी अशी शपथ घेते की, जोपर्यंत उद्धव साहेब पुन्हा सन्मानाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत नाहीत, तोपर्यंत मी अनवाणी राहीन. चप्पल घालणार नाही, असं आशा रसाळ (Aasha Rasal) म्हणाल्यात.

आशा रसाळ यांनी ही प्रतिज्ञा घेतल्यानंतर राज्यातील तमाम महिला वर्ग तसेच सामान्य जनतेला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीमागे उभे राहण्याचं आवाहन केलं आहे.

तमाम माता-भगिनींना विनंती करते की, तुम्ही सत्याच्या बाजूने उभ्या रहा. आपल्याला लवकरात लवकर विधानसभेवर भगवा फडकवायचा आहे. शिवसैनिकच नाही तर सामान्य जनतेलाही मी सत्याच्या बाजूने उभं रहावं, असं आवाहन करते.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now