उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नगरपरिषद निकालानंतर बड्या नेत्याने साथ सोडली

On: December 22, 2025 6:34 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray | राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरण तापले आहे. या निकालांमध्ये महाविकास आघाडीला मोठा फटका बसला असून, महायुतीने विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दणदणीत विजय मिळवला आहे. भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असून, शिवसेना शिंदे गट दुसऱ्या तर राष्ट्रवादी अजित पवार गट तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या निकालांचा सर्वाधिक फटका शिवसेना ठाकरे गटाला बसल्याचे चित्र आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याने ठाकरे गटातील अस्वस्थता उघडपणे समोर येऊ लागली आहे. दरम्यान, निकालानंतर अवघ्या काही तासांतच उद्धव ठाकरेंना पहिला मोठा राजकीय धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे.

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा राजीनामा :

नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे राजीनामा पाठवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे. स्थानिक पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्याचे आव्हान असतानाच अशा प्रकारे वरिष्ठ पदाधिकाऱ्याने राजीनामा दिल्याने पक्षातील असंतोष पुन्हा एकदा समोर आला आहे.

Uddhav Thackeray | पराभवानंतर पक्षाला लागलेली गळती वाढली

लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर ठाकरे गटाने मोठ्या अपेक्षा बाळगल्या होत्या. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये हे यश टिकवता आले नाही. त्यानंतर अनेक दिग्गज नेते आणि पदाधिकाऱ्यांनी महायुतीत प्रवेश केल्याने ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे.

भाजप आणि शिवसेना शिंदे गटात सातत्याने इनकमिंग सुरू असून, ठाकरे गटासाठी ही बाब डोकेदुखी ठरत आहे. राजू वैद्य यांच्या राजीनाम्यामुळे पक्षातील गळती थांबवण्याचे आव्हान अधिक कठीण झाले आहे.

दरम्यान, आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट मनसेसोबत युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार युतीबाबतची बोलणी अंतिम टप्प्यात असून, लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटही या युतीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

News Title: Uddhav Thackeray Faces Major Setback After Municipal Election Results, Senior Shiv Sena Leader Resigns

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now