उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृतीबद्दल महत्त्वाची माहिती समोर

On: October 14, 2024 6:59 PM
Uddhav Thackeray
---Advertisement---

Uddhav Thackeray l ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर एच एन रिलायन्स रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. कारण उद्धव ठाकरे यांची आज सकाळच्या सुमारास एच एन रिलायन्स रुग्णालयामध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांची तपासणी डॉक्टरांकडून केली जात होती. मात्र या तपासणी दरम्यान काही ब्लॉकेज आढळून आले. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

उद्धव ठाकरे रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल

शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आज चेकअपसाठी रुग्णालयात दाखल झाले होते. मात्र तपासणीनंतर त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. यापूर्वी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.

अशातच गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघाती प्रहार केला होता. काल सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतून चांगलीच तोफ डागली होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी सत्तेवर आल्यानंतर लगेचच धारावी पुनर्विकास प्रकल्पाची निविदा रद्द करू असे देखील म्हटले आहे. तर उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला ही निविदा प्राप्त झाली आहे.

Uddhav Thackeray l माझं सरकार येताच मी धारावीची निविदा रद्द करणार :

मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याला संबोधित करताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, सरकार धारावीच्या माध्यमातून मुंबईला पूर्णपणे लुटण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच अदानींना काय दिले नाही? आता तर सारी जमीन अदानींची होत आहे. पण मुंबई आम्हाला अदानीने दिलेली नाही.

तर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लढून आपण हे साध्य केले आहे. तसेच मी स्वतःसाठी लढत नाही. तर मी मुंबईसाठी लढत आहे. माझे सरकार येताच मी धारावीची निविदा ही रद्द करणारच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

News Title – Uddhav Thackeray admitted to Reliance Hospital

महत्त्वाच्या बातम्या-

सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींनी आणला होता पेपर स्प्रे? यामागचं धक्कादायक कारण समोर

बिष्णोई गँगचं ‘पुणे कनेक्शन’, अत्यंत धक्कादायक माहिती समोर

देशातील सर्वात मोठ्या संस्थेत नोकरीची संधी; कुठे कराल अर्ज?

धक्कादायक! मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात ‘लाडक्या बहिणीचा’ मृत्यू

मुंबईत टोलमाफी! राज ठाकरे म्हणाले,”आमच्या आंदोलनाला यश..”

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now