परीक्षा न देता थेट बँकेत मिळवा नोकरी; ‘या’ पदांसाठी अर्ज झाले सुरू

UCO Bank Recruitment | बँकेत नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी संधी आली आहे. युको बँकेने अप्रेंटिस पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार ucobank.com येथे युको बँकेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

या अंतर्गत तब्बल 544 पदे ही भरली जाणार आहेत. त्यामुळे इच्छुक तरुणांनी जराही वेळ वाया न घालवता लगेच अर्ज करण्यास सुरुवात करावी. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि नोकरीचे ठिकाण याबाबतची माहिती या लेखात दिली आहे.

या भरतीसाठी 2 जुलै 2024 पासून अर्ज सुरू झाले आहेत. उमेदवार 16 जुलैपर्यंत अर्ज भरू शकतात. त्यामुळे वेळ खूप कमी आहे. आज 5 जुलै असल्याने आता फक्त 11 दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे लगेच अर्ज भरण्यास घाई करावी.

पात्रता काय?

या भरतीसाठी भारत सरकार किंवा त्याच्या नियामक संस्थांकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थांमधून पदवीधारक असावा. त्यांचा निकाल दिनांक 01.07.2024 रोजी किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात आला असावा आणि उमेदवाराने बँकेच्या आवश्यकतेनुसार विद्यापीठ / संस्था / महाविद्यालयाकडून जारी केलेली गुणपत्रिका आणि तात्पुरते / पदवी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

स्टायपेंडमधील तपशील अप्रेंटिसशिपच्या कालावधीत (UCO Bank Recruitment) शिकाऊ व्यक्तीला 15000/- रुपये मासिक विद्यावेतन (भारत सरकारकडून अनुदान रकमेसह) दिले जाईल. यातील 10 हजार 500 रुपये उमेदवाराच्या खात्यात जमा होतील. तर, सरकारी मार्गदर्शक तत्त्वांनुसार 4,500 रुपये कापले जातील.

निवड कशी होणार?

या भरतीसाठी निवड ही शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांची स्क्रीनिंग आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षेचा समावेश असल्यास बँकेच्या संकेतस्थळावर (UCO Bank Recruitment) याची माहिती दिली जाईल. उमेदवारांना मुलाखत/ लेखी परीक्षेत किमान गुण मिळविणे आवश्यक आहे . मुलाखत/ लेखी परीक्षेत किमान पात्रता बँकेने ठरविल्याप्रमाणे असेल. अधिक संबंधित माहितीसाठी उमेदवार युको बँकेची अधिकृत वेबसाइट पाहू शकतात.

News Title – UCO Bank Recruitment

महत्वाच्या बातम्या-

वंचितला राम राम केलेल्या वसंत मोरेंवर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल; थेट म्हणाले…

लग्नाआधीच सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट?; सोशल मीडियावर झाला खुलासा

शरद पवार आणि राहुल गांधींनंतर आता अजित पवारही करणार पायीवारी!

मोठी बातमी! नीट परीक्षेची नवी तारीख अखेर जाहीर, ‘या’ दिवशी होणार परीक्षा

“माझा वापर केला, माझी इज्जत..”; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा