उबेर बाईक टॅक्सीमधून प्रवास करण्यापूर्वी सावधान! ही बातमी वाचाच

On: March 25, 2025 12:29 PM
Uber Moto safety rules
---Advertisement---

Uber Moto safety rules l देशभरात बाईक टॅक्सींची वाढती मागणी पाहता Uber ने आपल्या ‘Uber Moto’ प्लॅटफॉर्मवर नवीन सुरक्षा नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नव्या फीचर्समुळे रायडर्स आणि चालकांचा प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. विशेषतः महिलांसाठी उबरने काही महत्त्वाचे सेफ्टी पर्याय जाहीर केले आहेत.

हेल्मेट ‘सेल्फी’ अनिवार्य, अ‍ॅपवर ‘नजेस’ नोटिफिकेशन :

Uber ने AI-आधारित ‘Helmet Selfie’ फीचर लागू केलं आहे. चालकाने हेल्मेट घातलं आहे की नाही, हे ट्रॅव्हल सुरू होण्यापूर्वी सेल्फीद्वारे तपासलं जाईल. तसेच, रायडर्सनाही हेल्मेट घालण्याची आठवण अ‍ॅपवर ‘Helmet Nudges’ नोटिफिकेशनद्वारे करून दिली जाईल.

उबरने संपूर्ण भारतभर 3000 सेफ्टी किट्स वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या किट्समध्ये हेल्मेट, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, सेफ्टी स्टिकर्स आणि इतर सुरक्षा साहित्य असणार आहे. दिल्लीतील पहिल्या टप्प्यात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री हर्ष मल्होत्रा यांच्या हस्ते वितरण सुरू झालं आहे.

Uber Moto safety rules l महिलांसाठी ‘महिला रायडर’ फीचर – सुरक्षिततेचा नवा टप्पा :

Uber Moto मध्ये महिलांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. आता महिला चालक फक्त महिला रायडर्सनाच निवडू शकतील. यामुळे महिलांना प्रवासादरम्यान अधिक सुरक्षित वाटेल आणि महिला ड्रायव्हर्ससाठीही नव्या संधी उघडल्या जातील.

एकीकडे बाईक टॅक्सी सेवांची लोकप्रियता वाढते आहे, तर दुसरीकडे भारताच्या अर्थव्यवस्थेत याचे महत्त्वपूर्ण योगदान होऊ लागले आहे. UK आधारित ‘Public First’ च्या रिपोर्टनुसार, 2024 पर्यंत उबरच्या मोटो व ऑटो सेवांचा 36,000 कोटी रुपयांचा आर्थिक परिणाम होणार आहे. तसेच KPMGच्या अहवालानुसार, 2030 पर्यंत बाईक टॅक्सी क्षेत्रात 54 लाख नोकऱ्या निर्माण होतील.

News Title: Uber Introduces Helmet Selfie & Women Rider Option for Safer Bike Taxi

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now