पुण्यात झिका व्हायरसचे 2 रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ

Pune Zika Virus | पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे येथील एरंडवणामध्ये झिकाचे दोन रुग्ण आढळले आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुण्यातील एका डॉक्टराला आणि त्याच्या मुलीला झिका व्हायरसचा संसर्ग झाला आहे. या दोघांमध्ये ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली आहेत. त्यामुळे पुणेकरांच टेन्शन वाढलं आहे.

पुण्यात झिकाचे आढळले दोन रुग्ण :

पुण्यात झिकाचे दोन रुग्ण आढळल्याने या दोघांवरही सध्या उपचार सुरु असून त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. मात्र त्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कोणत्याही व्यक्तींमध्ये संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसून आलेली नाहीत.

मात्र पुणे शहरात पावसाळ्याच्या सिझनमध्ये पहिल्यांदाच झिकाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पुणेकरांनी आरोग्यासंदर्भात योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. याशिवाय गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने विशेष काळजी घ्यावी असा सल्ला आरोग्य अधिकाऱ्यांनी पुणेकरांना दिला आहे.

Pune Zika Virus | दोन्ही रुग्णांवर उपचार सुरु :

एरंडवणा येथील झिकाच्या रुग्णांपैकी पहिला रुग्ण हा डॉक्टरच आहे. या 46 वर्षीय डॉक्टराच्या संपर्कात त्याची 15 वर्षीय मुलीलाही याचा संसर्ग झाला आहे. सर्वप्रथम या डॉक्टरला ताप आणि अंगावर लाल चट्टे उठल्याची लक्षणे दिसून आली आहेत. त्यावेळी स्वतः डॉक्टरांनी रक्ताचा नमुना तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत पाठवलेला होता. त्यांना झिकाचा संसर्ग झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांना यासंदर्भातील माहिती अमोर आली आहे.

यानंतर डॉक्टरच्या मुलीमध्ये देखील झिकाची सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. तिच्या रक्त राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठवले होते. या चाचणीमध्ये या मुलीलाही झिकाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झालं आहे. या दोघांवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागाने या दोघांच्याही संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी देखील केली आहे. दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये अद्याप तरी झिकाची कोणतीही लक्षणे आढळून आलेली नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे.

News Title – Two Zika patients found in Pune

महत्त्वाच्या बातम्या

विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान; आता महायुती की महाविकास आघाडी?

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ कंपनीचा IPO बाजारात दाखल

या राशीच्या व्यक्तींवर आर्थिक संकट ओढवणार

“तुमच्यातील खरा माणूस अनेकांना कळला नाही…”, निलेश राणेंची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

इंग्रजी भाषेतून शपथविधी म्हणजे विखेंना प्रत्युत्तर?, निलेश लंके म्हणाले…