‘उर्फीला हात लावून दाखवा’; या महिला नेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

On: January 3, 2023 7:05 PM
---Advertisement---

मुंबई | सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) उर्फी जावेदमुळे नव्या वादाला तोंड फुटला आहे. तसेच राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असल्याचं दिसून येतय. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी याविषयी निषेध व्यक्त केला होता. त्यानंतर याबाबत काही संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

काही ठिकाणी उर्फी जावेदची बाजू घेतली जात आहे. दुसरीकडे तिच्याविरोधात आंदोलनं देखील होत आहेत. शिवसेनेच्या महिला उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी देखील उर्फी जावेदची बाजू घेतल्याचं दिसून आलं.

उर्फी जावेद दिसता क्षणी मी तिचं थोबाड रंगवेन, असं वक्तव्य चित्रा वाघ यांनी केलं होत. चित्रा वाघ याच्या वक्तव्याला आवाहन देत भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई (Tripti Desai) यांनी उर्फीची बाजू घेतली.

कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाच नाही आहे. महिलांविषयी काम करताना एखाद्या महिलेविरोधात अशी भाषा अजिबात करु नये. उर्फी जावेदचं (Urfi Javed) थोबाड रंगवण्याचा प्रश्न राहिला बाजूला तिला हात लावून दाखवा. आम्ही तिच्या सोबत अहोत. असा थेट इशारा तृप्ती देसाईंनी वाघ यांना दिला आहे.

प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य (freedom of expression) आहे. कोणी काय कपडे घालावे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. उर्फी जावेद शिवाय अजूनही अशा काही अभिनेत्री त्यांच्याबद्दल का कधी बोलत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

21 व्या शतकात वावराताना आपले विचारत संकुचित ठेवणं बरोबर नाही. विरोध करायचा असेल तर सर्वांनाच करा अथवा अशाप्रकारचे संकुचित विचार लवकरात लवकर थांबवा, असं ही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now