उत्तर प्रदेशात रेल्वेचा भीषण अपघात! 10 ते 12 डब्बे रुळावरून घसरले, मृतांचा आकडा समोर

On: July 18, 2024 4:59 PM
Train Accident in UP
---Advertisement---

Train Accident in UP | उत्तर प्रदेशमध्ये दिब्रूगड एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाला आहे. गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्याची माहिती समोर आली आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, या घटनेत आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले (Train Accident in UP) आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दिब्रूगड एक्स्प्रेसचा अपघात

गोरखपूर रेल्वे सेक्शनच्या मोतीगंज सीमेजवळ जिलाही दरम्यान एक्स्प्रेस रेल्वेचा हा अपघात झाला. या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्य सचिव आणि डीजीपी(Train Accident in UP) यांच्यासोबत चर्चा करत तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना केल्या.

तसेच आजूबाजूच्या जिल्ह्यातील सर्व रुग्णालये, सीएचसी, प्राथमिक आरोग्य केंद्रांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. एसडीआरएफच्या टीमलाही घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू

गेल्या महिन्यात देखील पश्चिम बंगालमध्ये कंचनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता नुकत्याच झालेल्या (Train Accident in UP)अपघातात किती जणांचा मृत्यू झालाय, तसेच किती जखमी झाले आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही.

News Title –  Train Accident in UP

महत्त्वाच्या बातम्या-

महिलांनो ‘या’ दोन गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; अन्यथा होऊ शकतो Breast Cancer

कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर!

कोकण किनारपट्टीला मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईला देखील पाऊस झोडपणार

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीमद्वारे महिन्याला कमवा 10 हजार रुपये; जाणून घ्या अधिक

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियाची धुरा कुणाकडे असणार?, मोठी माहिती आली समोर

Join WhatsApp Group

Join Now