विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी आज मतदान; आता महायुती की महाविकास आघाडी?

Vidhan Parishad Election l लोकसभा निवडणुक अत्यंत चुरशीची झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. या निवडणुकीत महायुतीला सर्वात मोठा धक्का बसला आहे. अशातच आता लोकसभा निवडणुकीनंतर सर्वत्र विधानसभा निवडणुकीचंही वारे फिरायला सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आज राज्यात महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे अवघ्या राज्याचंलक्ष लागलं आहे.

1 जुलैला होणार मतमोजणी :

महाराष्ट्र विधान परिषदेच्याया चार जागांचे मतदान होत आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघ समाविष्ट आहेत. यामध्ये मुंबई व कोकण पदवीधर मतदार संघ आणि नाशिक व मुंबई शिक्षक या मतदार संघात ही निवडणूक आज पार पडणार आहे. त्यासाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. या जागांसाठी झालेल्या निकालाची मतमोजणी ही 1 जुलैला होणार आहे.

नाशिक मतदार संघांमध्ये सकाळी 7 वाजता मतदान सुरु झाले आहे. यावेळी तब्बल 63 केंद्र आणि 90 बूथवर मतदान होत आहे. तर 69 हजार शिक्षक मतदार आपला आमदार ठरवणार आहेत. नाशिकमध्ये संदीप गुळवे – ठाकरे गट, ऍड महेन्द्र भावसार – अजित दादा गट , किशोर दराडे – शिंदे गट, विवेक कोल्हे – अपक्ष यांच्यात जोरदार लढत होत आहे.

Vidhan Parishad Election l कोकण पदवीधरमध्ये कशी रंगणार लढत? :

विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरवात झाली आहे. यावेळी कोकण विभाग पदवीधर मतदार संघात एकूण 2 लाख 23 हजार 225 मतदार हक्क बाजवणार आहेत. यामध्ये सर्वाधिक मतदार ठाणे जिल्हयात म्हणजेच 98 हजार 860 इतके मतदार आहेत. तसेच यामध्ये तब्बल 42 हजार 478 स्त्री मतदार तर 56 हजार 271 पुरुष आणि 11 तृतियपंथीय मतदार आहेत. ठाणे जिल्ह्यात एकुण 124 मतदान केंद्रावर मतदान होत आहे. तर या ठिकाणी एकूण 13 उमेदवार रिंगणात उतरले आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब आणि भाजपचे किरण शेलार यांच्यात चुरशीची लढत होत आहे. मुंबई शिक्षक मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे ज. मो. अभ्यंकर यांच्याविरोधात भाजपचे शिवनाथ दराडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच सुभाष मोरे (शिक्षक भारती), शिवसेना शिंदे गट पुरस्कृत उमेदवार शिवाजी शेंडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवाजी नलावडे हे देखील रिंगणात आहे.

News Title – Today Vidhan Parishad Election 

महत्त्वाच्या बातम्या

पैसे कमवण्याची सुवर्णसंधी! ‘या’ कंपनीचा IPO बाजारात दाखल

या राशीच्या व्यक्तींवर आर्थिक संकट ओढवणार

“तुमच्यातील खरा माणूस अनेकांना कळला नाही…”, निलेश राणेंची वडिलांसाठी भावनिक पोस्ट

इंग्रजी भाषेतून शपथविधी म्हणजे विखेंना प्रत्युत्तर?, निलेश लंके म्हणाले…

पुण्यात हिट अँड रन प्रकार सुरूच, ससूनच्या डॉक्टरने तिघांना चिरडले