अगदी वरचा देव जरी आला तरी… उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड

On: June 22, 2024 10:12 AM
Udayanraje Bhosale
---Advertisement---

Udayanraje Bhosale l देशभरात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या महायुतीला मोठा धक्का बसला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला नऊ जागांवर विजय मिळवता आला आहे. मात्र या निवडणुकीदरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्यच लक्ष लागलं होत.

जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? :

सातारा लोकसभा मतदार संघ हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. या चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या उदयनराजे भोसले यांनी शरद पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचा दारुण पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात विजय खेचून आणल्यानंतर उदयनराजे भोसले यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे आता उदयनराजे भोसले यांनी आगामी काळात सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर आमचीच पकड राहील असे सांगत दंड थोपटले आहेत.

साताऱ्यातील कोरेगाव येथे एक कार्यक्रम पार पडला. यावेळी उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली आहे. आता शिवेंद्रराजे आणि मी एकत्र आलो आहोत. त्यामुळे आता मला बघायचे आहे की, जिल्ह्याच्या राजकारणात कोण काय करतंय? कोणीही किती शड्डू ठोका, असे सांगत खासदार उदयनराजे भोसले यांनी दंड थोपटत विरोधकांना आव्हान दिले आहे.

Udayanraje Bhosale l उदययनराजे यांनी विरोधकांना केलं थेट आवाहन :

साताऱ्यात उदययनराजे यांनी विरोधकांना थेट खुलेआम आवाहन दिले आहे. आता कोणी कितीही शड्डू ठोकले, आणि कोणीही येऊ दे, अगदी वरचा देव जरी आला तरी इथे माझा देव शिवेंद्रराजे, महेश शिंदे, मनोज घोरपडे, अतुल भोसले हे माझ्यासोबत आहेत असे उदयनराजे भोसले कार्यक्रमावेळी म्हटले आहेत.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या समर्थकांना गाफील न राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. यावेळी उदयनराजे भोसले आता निवडून आले म्हणजे सगळे झाले असे समजू नका. तुम्ही निवांत राहिलात तर मेलाच म्हणून समजा, असे उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

News Title – Today Udayanraje Bhosale News

महत्त्वाच्या बातम्या

ओबीसी समाजाची बैठक ‘मॅनेज’ होती; मनोज जरांगेंचा खळबळजनक आरोप

ओबीसींसाठी महत्वाचा दिवस; लक्ष्मण हाकेंच्या भेटीला ‘हे’ मोठे मंत्री जाणार

या राशीच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवावे, अन्यथा…

लक्ष्मण हाकेंचं उदाहरण देत पंकजा मुंडेंचा जरांगेंना टोला, म्हणाल्या…

लक्ष्मण हाकेंनी काढली मनोज जरांगेंची लायकी, म्हणाले…

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now