महत्वाची बातमी! पुढील दोन दिवस राज्यात पाऊस हजेरी लावणार का?

Rain Update l राज्यातील सर्वच भागात पाऊस हजेरी लावत आहे. अशातच राज्यातील पुढील दोन दिवस मुंबईतील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील शहर आणि उपनगरात बहुतांशी मध्यम ते मुसळधार पाऊस अपेक्षित असल्याचं दिसत आहे. त्यामुळे राज्यातील पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता आहे.

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता :

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात 4 आणि 5 जुलै रोजी हा हलका व मध्यम पाऊस असणार आहे. कारण त्यावेळी पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. तसेच ६ जुलैपासून पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच उत्तर भागात देखील जास्त पाऊस अपेक्षित आहे, तर दक्षिण मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मुंबईमध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली होती. तसेच पावसाचा जोर शनिवारपासून कमी झालेला नाही. कारण दादर, परळ आणि मुंबई सेंट्रल भागात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. याशिवाय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहेत. त्यामुळे मोसमी पाऊस सक्रिय होण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे पुढील तीन ते चार दिवस राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Rain Update l शहापूरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी :

शहापूरमध्ये देखील सकाळपासून संतधार पाऊस सुरू झाला आहेत. त्यामुळे मुंबई नाशिक महामार्गावर शहापूर – आसनगाव, वशिंद दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी 7 ते 8 किलोमीटर पर्यंत लागल्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असल्याच्या दिसून आल्या आहेत.

तसेच सतत होत असल्या पावसामुळे मुंबई नाशिक हायवेवरती देखील खड्डे पडले आहेत. अशातच दुसरीकडे रेल्वेचे ब्रिज व वाशिंद या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू आहे. तयामुळे मुंबई- नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना वाहन चालकांना करावा लागत आहे.

News Title – Today Maharashtra Rain Update

महत्त्वाच्या बातम्या- 

पुणेकरांसाठी धोक्याची घंटा; ‘या’ भागातील दोन गर्भवती महिलांना झाली झिकाची लागण

या राशीच्या व्यक्तींनी वाहन चालवताना काळजी घ्यावी

विधानपरिषदेत राडा; दानवेंनी प्रसाद लाडांना दिली शिवी, म्हणाले ‘ए मा****’

“हा माझा विजय तितकाच तुझाही विजय”, विराटची अनुष्कासाठी भावुक पोस्ट

मोठी बातमी! लोकसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडेंची थेट विधान परिषदेवर वर्णी