या राशीच्या व्यक्तींना व्यवसायात यश मिळणार

On: June 29, 2024 8:18 AM
Today Horoscope
---Advertisement---

Today Horoscope l मेष:- चांगली बातमी समजेल. खेळ व मनोरंजन यात वेळ निघून जाईल. कटू प्रसंगाचे रूपांतर गोडव्यात कराल. अतिविचार करत राहू नये. जोडीदाराचे सहकार्य अपेक्षित राहील. शुभ अंक ९, शुभ रंग हिरवा

वृषभ:- जोडीदार तुमच्यावर खुश राहील. जवळच्या प्रवासाची संधी मिळेल. हातातील कलेचे कौतुक केले जाईल. सामाजिक बांधीलकी विसरून चालणार नाही. भावंडांसोबत अनमोल क्षण घालवाल. शुभ अंक १, शुभ रंग नारंगी

मिथुन:- चालत आलेली संधी ओळखा. जोडीदाराकडून आश्चर्यचकित केले जाईल. कामातून समाधान मिळेल. मित्रांचा रोष गोडीने कमी करावा. मन प्रसन्न राहील. शुभ अंक ७, शुभ रंग पोपटी

कर्क:- मुलांसाठी चांगला काळ आहे. नवीन नोकरी शोधात असणार्‍यांना यश येईल. आपल्या कर्तुत्वाला भरारी घेता येईल. हातात नवीन अधिकार येतील. मुलांच्या जबाबदार्‍या उत्तमरीत्या पार पाडाल. शुभ अंक २, शुभ रंग पिवळा

सिंह:- आत्मविश्वासाने निर्णय घ्या. नोकरीमध्ये चांगला काळ असेल. आपल्या तब्येतीप्रमाणे खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. व्यापार्‍यांच्या प्रयत्नाला यश येईल. विरोधक नामोहरम होतील. शुभ अंक ६, शुभ रंग निळा

कन्या:- प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. आपले मत उत्तमरीत्या मांडू शकाल. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. मेहनत, आणि प्रयत्न यांची कास सोडू नये. शुभ अंक ४, शुभ रंग गुलाबी

Today Horoscope l तूळ:- बोलण्यातून इतरांची माने जिंकाल. संपूर्ण दिवस धावपळीत जाईल. दिवसाची सुरुवात उत्साहात कराल. जोडीदाराचे वर्चस्व राहील. झोपेची तक्रार जाणवेल. शुभ अंक ८, शुभ रंग नारंगी

वृश्चिक:- आजचा दिवस मनासारखा जाईल. जुनी येणी वसूल होतील. पोटाच्या विकारांकडे दुर्लक्ष करू नका. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. एखादी जुनी समस्या संपुष्टात येईल. शुभ अंक ९, शुभ रंग काळा

धनू:- मनातील नसत्या शंका काढून टाकाव्यात. खर्चावर नियंत्रण ठेवा. विरोधक परास्त होतील. कार्यालयात प्रशंसेस पात्र व्हाल. क्रोधवृत्तीत वाढ होईल. व्यवसायात यश मिळणार. शुभ अंक ६, शुभ रंग गुलाबी

मकर:- जुनी खोळंबलेली कामे मार्गी लागतील. इतरांच्या विश्वासाला खरे उतरा. आर्थिक पातळीवर यशकारक दिवस. मिळकतीच्या बाबतीत केलेले प्रयत्न यश देतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ अंक १, शुभ रंग पोपटी

कुंभ:- नोकरी-व्यवसायात सन्मान मिळेल. दिवस धावपळीत जाईल. भावंडांची मदत मोलाची ठरेल. मन प्रसन्न राहील. नवीन ओळख वाढवावी. शुभ अंक ३, शुभ रंग पिवळा

Today Horoscope l मीन:- चारचौघात कौतुकास पात्र व्हाल. घरातील महत्त्वाच्या कामात हातभार लावाल. गोड शब्दात मत मांडावे. शक्यतो नातेवाईकांशी व्यवहार टाळावेत. चांगल्या गोष्टीसाठी खर्च कराल. शुभ अंक ५, शुभ रंग नारंगी

News Title – Today Horoscope

महत्त्वाच्या बातम्या-

Diabetes रुग्णांसाठी जांभूळ एक वरदानच; जाणून घ्या याचे फायदे

“थापांचा नाही तर मायबापांचा अर्थसंकल्प, दिलेलं आश्वासन पूर्ण करू”

“लोकसभा अध्यक्षांनी राहुल गांधींचा माईक बंद केला”, नवनिर्वाचित खासदारांचा गंभीर आरोप

आचार्य चाणक्यांनी सांगितलं विवाह आणि वयाचं महत्त्व!

अजित पवारांच्या बजेटमध्ये कुणाला काय मिळालं?; A To Z माहिती वाचा एका क्लिकवर

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now