आज ग्रहमान कोणत्या राशीला साथ देतील?, वाचा मेष ते मीनचे राशीभविष्य

On: September 25, 2024 7:41 AM
Today Horoscope 25 September
---Advertisement---

Today Horoscope | आज 25 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे. अष्टमी तिथी 12 वाजून 11 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज अष्टमी तिथी असणाऱ्यांचे श्राद्ध केले जाईल. आज वरियान योग जुळून आला आहे. वरियान योग रात्री 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत राहील. तसेच आज रात्री 10 वाजून 24 मिनिटांपर्यंत आर्द्रा नक्षत्र जागृत असेल.आज बुधवारचा दिवस मेष ते मीनसाठी कसा असेल हे पाहुयात.  (Today Horoscope)

आजचे राशीभविष्य-

मेष रास : मन शांत ठेवा. अति जास्त विचार करू नका. तुमच्या बाबत गैरसमज वाढू शकतो. खर्चात वाढ संभवते. आर्थिक नियोजनावर विचार कराल.

वृषभ रास : आज विद्यार्थी वर्ग खुश असेल. दिवस बर्‍यापैकी व्यस्त राहील. कामे उरकताना दमछाक होऊ शकते. आजचा दिवस धावपळीचा असेल, आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास : आज तुम्ही सकारात्मक राहाल. कोणतेही काम आले तरी तुम्ही ते झटपट पूर्ण कराल. मन स्थिर ठेऊन विचार करावा. चंचलतेवर मात करावी लागेल.

कर्क रास : आपल्या धाडसाचे फळ मिळेल. कोर्टातील कामे मार्गी लावाल. ग्रहमानाची साथ लाभेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमचा  आत्मविश्वास वाढेल. घरात आनंदी वातावरण राहील. (Today Horoscope)

सिंह रास : आज जवळचा प्रवास योग आहे. हातातील कामात यश येईल. दिवस फलदायी ठरेल. हस्तकलेला वाव मिळेल, त्यामुळे मन आनंदी राहील.

कन्या रास : मानसिक स्वास्थ्य जपावे. इतरांना सढळ हाताने मदत कराल. नोकरदार वर्गाला दिवस चांगला जाईल. आज नोकरीच्या ठिकाणी तुमचे प्रमोशन होऊ शकते.

तूळ रास : आजचा दिवस संमिश्र राहील. हातातील काम यशस्वी होईल. बोलताना शब्द जपून वापरा. आज वाद-विवाद होऊ शकतात. जोडीदारावर सगळा राग निघू शकतो, त्यामुळे शांत राहायचे प्रयत्न करा.

वृश्चिक रास : आज तुम्हाला नवीन संधी मिळेल, या संधीचा फायदा घ्या. मोठ्या लोकांकडून प्रशंसा केली जाईल. एखाद्या गोष्टीने मन विचलित होऊ शकते.आज खूप दिवसांपासून असलेला एखादा वाद संपुष्टात येईल.

धनू रास : घरातील कामात जास्तीत जास्त वेळ घालवाल. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करावे. ज्ञानात भर पडेल. कामाव्यतिरिक्त इतर गोष्टी लक्ष वेधून घेतील. (Today Horoscope)

मकर रास : आज तुम्ही आवडत्या गोष्टींची खरेदी कराल. हातातील गोष्टी जपून ठेवा. जुनी कामे आधी मार्गी लावावीत. आज तुम्हाला अचानक धनलाभ देखील होऊ शकतो.

कुंभ रास : या राशीच्या व्यक्तींनी फसवणुकीपासून सावध राहावे. बौद्धिक क्षमता वाढेल. सारासार विचार करण्यावर भर द्यावा. घरगुती गैरसमज टाळावेत.

मीन रास : आज जवळचा प्रवास योग आहे. आज तुम्ही निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाल. मित्रांशी भेट होईल. आज दिवसभर मन प्रसन्न राहील. आजचा दिवस आनंदी जाईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घ्याल. (Today Horoscope)

News Title : Today Horoscope 25 September

महत्वाच्या बातम्या –

अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर अजित पवारांचं मोठं भाष्य!

गोळ्या घालून नाही तर… तुडवून मारायला पाहिजे होतं; उदयनराजेंची बेधडक प्रतिक्रिया

अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मागची कथा खरी की खोटी?

‘आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही’; संजय शिंदेेंनी केला गौप्यस्फोट

अक्षय शिंदेच्या पोस्टमार्टमचा व्हिडीओ रेकॉर्डिंगमधून खुलासा होणार?

Join WhatsApp Group

Join Now