Today Horoscope l मेष:- कामात जैसेथे परिस्थिती राहील. काही जबाबदार्या नव्याने वाढतील. आवडी निवडीबाबत आग्रही राहाल. कौटुंबिक सौख्याला प्राधान्य द्याल. चटपटीत पदार्थ खाण्याची हौस पूर्ण होईल. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ६
वृषभ:- सर्वांशी तोंडात साखर ठेवून वागाल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चार चौघात मिळून मिसळून वागाल. नवीन ओळखीतून मैत्री वाढेल. हौस पूर्ण करून घ्याल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक १
मिथुन:- वरिष्ठांच्या सल्ल्याने तजवीज करावी. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. तसेच काही खर्च देखील वाढतील. मानसिक दोलायमानता दूर करावी. कामाचे नियोजन यशस्वी होईल. शुभ रंग काळा, शुभ अंक ९
कर्क:- कामाचा आवाका लक्षात घ्या. क्षुल्लक गोष्टींमुळे कामे रेंगाळू शकतात. अडथळ्यातून प्रयत्नाने मार्ग काढावा. कौटुंबिक खर्च वाढू शकतो. मनातील इच्छा पूर्ण होईल. शुभ रंग जांभळा, शुभ अंक ४
सिंह:- तरूणांशी मैत्री वाढेल. त्यांचे नवीन विचार जाणून घ्याल. बरेच दिवसा नंतर जुने मित्र भेटतील. कमिशनमधून चांगला लाभ उठवाल. कलेचे योग्य प्रशस्तिपत्रक मिळेल. शुभ रंग लाल, शुभ अंक ८
कन्या:- एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. चार चौघांसमोर तुमची कला सादर करता येईल. मुलांकडून गोड बातम्या मिळतील. शुभ रंग पिवळा, शुभ अंक ३
तूळ:- कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न कराल. सासुरवाडीकडून मदत मिळेल. सांपत्तिक दर्जा सुधारण्याचा प्रयत्न कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मोठ्या लोकांची ओळख होईल. शुभ रंग नारंगी, शुभ अंक ७
Today Horoscope l वृश्चिक:- जुने प्रश्न मार्गी लावाल. कामाचा ताण वाढू शकतो. वडीलधार्यांचा विरोध सहन करावा लागेल. मनातील निराशा झटकून टाका. जुन्या मित्रांशी संपर्क साधता येईल. संपत्तीमध्ये वाढ होईल. शुभ रंग विटकरी, शुभ अंक २
धनू:- सामाजिक गोष्टींचे भान राखावे लागेल. प्रामाणिक प्रयत्नांना आपलेसे कराल. फटकळपणे बोलणे टाळा. वाईट संगतीचा मार्ग स्वीकारू नका. शुभ रंग पोपटी, शुभ अंक ८
मकर:- कामातील ऊर्जा वाढेल. चिकाटी कमी पडू देऊ नका. सारासार विचाराने उलाढाल करा. प्रेमप्रकरणाला नवीन चैतन्य लाभेल. एकमेकांचे विचार जाणून घ्याल. शुभ रंग हिरवा, शुभ अंक १
कुंभ:- घरात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक सुखसोईंकडे विशेष लक्ष द्याल. जवळच्या ठिकाणी फिरायला जाता येईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. मानसिक आनंदाचा दिवस. शुभ रंग गुलाबी, शुभ अंक ३
Today Horoscope l मीन:- प्रवासाची आवड भागवाल. हस्तकलेचे कौतुक केले जाईल. नवीन वाद्य शिकायला सुरवात करावी. जवळच्या मित्र मंडळींमध्ये दिवस घालवाल. गैरसमजाची ठिणगी पडू देऊ नका.शुभ रंग निळा, शुभ अंक ९
News Title – Today Horoscope
महत्त्वाच्या बातम्या
“आदित्य ठाकरे वरळीत उभे राहणार की दुसरा मतदारसंघ शोधणार?”
आमदाराच्या पुतण्याबाबत महत्त्वाची माहिती समोर!
पुणे हादरलं! 13 वर्षीय मुलीवर वडील, चुलता आणि भावाकडून बलात्कार
‘अटल सेतू’ प्रकल्पाबाबत महत्त्वाची अपडेट समोर!
‘या समाजालाही ओबीसातून आरक्षण द्या’; मनोज जरांगेंची मोठी मागणी






