Today Horoscope | आज 24 सप्टेंबररोजी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाची सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथी दुपारी 12 वाजून 40 मिनिटांपर्यंत राहील. आज मंगळवारी रात्री 1 वाजून 27 मिनिटांपर्यंत व्यतिपात योग राहील. तसेच मृगशिरा नक्षत्र रात्री 9 वाजून 54 मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. (Today Horoscope)
याचबरोबर आज कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी आहे आणि यादिवशी कालाष्टमी व्रत केले जातात. कालाष्टमीचा दिवस शुभ मानला जातो. आज शिवाच्या कालभैरव रूपाची पूजा केल्याने शिवभक्तांच्या सर्व अडचणी दूर होतात, असं म्हटलं जाते. आजच्या या शुभ दिवशी कोणत्या राशीवर काल भैरवची कृपा असणार, ते पाहुयात.
आजचे राशी भविष्य –
वुषभ रास : आजचा दिवस तुम्ही आपल्या मनाप्रमाणे जगाल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका. आज तुम्हाला दिवसभर प्रसन्न वाटेल.
मिथुन रास : आज तुमच्यावर काल भैरवची कृपा राहील. आज तुम्ही दिवसभर सकारात्मक राहाल. हातात घेतलेले काम तुम्ही झटपट पूर्ण कराल. आज तुमची गाठ जुन्या मित्रांशी पडेल. आज स्वादिष्ट जेवणाचा बेत बनेल. (Today Horoscope)
कर्क रास : आज तुमच्या मनातील इच्छा-आकांक्षा काल भैरवाच्या कृपेने पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस. आज तुम्हाला शेअर मार्केटमध्ये देखील मोठा लाभ मिळेल. आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
सिंह रास : कामानिमित्त प्रवास घडेल. तुम्ही तुमच्या नेतृत्व कौशल्याने सर्वांची मने जिंकाल. तुमच्यावर आज मोठी जबाबदारी पडू शकते. आज नोकरीच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल. तुमची बढती देखील होऊ शकते. (Today Horoscope)
कन्या रास : आज तुम्हाला अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.(Today Horoscope)
News Title : Today Horoscope 24 September
महत्वाच्या बातम्या –
एन्काऊंटरनंतर अक्षय शिंदेबद्दल आईने केला मोठा खुलासा!
“माझा पोरगा भोळाय, तो फटाक्याला घाबरतो, गोळी कशी चालवेल, त्याला पैसे देऊन मारलं”
एन्काऊंटरमध्ये आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू, आरोपीबद्दल मोठी माहिती समोर!
मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांकडून एनकाऊंटर?
सर्वात मोठी बातमी! बदलापूर प्रकरणातील आरोपीने स्वत:वरच झाडून घेतली गोळी






