Today Horoscope | आज 21 ऑक्टोबररोजी अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंचमी तिथी आहे. सोमवारी रात्री अडीच वाजेपर्यंत पंचमी तिथी राहील. त्याचप्रमाणे 11 वाजून 11 मिनिटांपर्यंत वरियान योग जुळून येईल. आज राहू काळ सकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल ते 9 वाजेपर्यंत असेल. याशिवाय आज मंगळाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. तर, आज सोमवारी महादेवाच्या कृपेने कोणाच्या आयुष्यात सुखाचे दिवस येणार ते पाहुयात. (Today Horoscope)
आजचे राशी भविष्य
मेष रास : आज तुम्ही मनात ठरवलेल्या सर्व गोष्टी सत्यात उतरतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. व्यावसायिक उन्नती साधता येईल. गुंतवणुकीतून तुम्हाला आज आर्थिक लाभ होईल, यामुळे दिवसभर प्रसन्न राहाल.
कर्क रास : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. आज भोलेनाथांच्या कृपेने कर्क राशीच्या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. नोकरी करणारे लोक आज दुसऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. आज सोनं खरेदी करण्याचा विचार कराल. तुमची आर्थिक प्रगती होईल. (Today Horoscope)
कन्या रास : कन्या राशीचे लोक आज एखाद्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात. आज तुमचे सरकारी योजनेचे पैसे येतील. यामुळे आनंदी राहाल. आज तुम्ही व्यवसायात एखादी योजना सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन चांगलं राहील. (Today Horoscope)
वृश्चिक रास : कौटुंबिक मालमत्तेशी संबंधित काही वाद चालू असतील तर ते आज कुटुंबातील सदस्याच्या मदतीने सोडवले जाऊ शकतात. आज दान-धर्म कराल. विवाह योग जुळून येईल. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे विवाहस्थळ चालून येईल.
धनू रास : तुम्हाला आज मुलांकडून सुवार्ता मिळतील. घरगुती मुद्दे शांततेने हाताळा. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. नोकरीची नवीन संधि प्राप्त होऊ शकते. आर्थिक स्थिती सुधारेल. (Today Horoscope)
News Title : Today Horoscope 21 October 2024
महत्वाच्या बातम्या –
कुणाचा भाऊ, कुणाचा मुलगा तर कुणाची लेक, भाजपच्या पहिल्या यादीत नवे चेहरे
पहिल्या यादीत दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट; पाहा कोणाचं तिकीट कापलं
‘या’ भाजप नेत्याच्या लेकीला मिळालं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार
सर्वात मोठी बातमी! भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?






